मी निष्ठावान शिवसैनिक, काँग्रेसमध्ये जाणे शक्यच नाही- अर्जुन खोतकर

''जालना लोकसभा मतदारसंघातुन माझी उमेदवारी निश्चित झाली आहे. त्यामुळे खासदार रावसाहेब दानवे यांच्या पायाखालची वाळू आतापासून सरकायला लागली. या निराशेतूनच दानवे मी काँग्रेसमध्ये जाणार असा आरोप करत आहेत. शिवसैनकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा दानवे यांचा प्रयत्न यशस्वी होणार नाही. मी शिवसेनेचा सच्चा निष्ठावान सैनिक आहे, काँग्रेसमध्ये कदापी जाणार नाही," असा खुलासा शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी 'सरकारनामा'शी बोलतांना केला.
मी निष्ठावान शिवसैनिक, काँग्रेसमध्ये जाणे शक्यच नाही- अर्जुन खोतकर

औरंगाबाद : ''जालना लोकसभा मतदारसंघातुन माझी उमेदवारी निश्चित झाली आहे. त्यामुळे खासदार रावसाहेब दानवे यांच्या पायाखालची वाळू आतापासून सरकायला लागली. या निराशेतूनच दानवे मी काँग्रेसमध्ये जाणार असा आरोप करत आहेत. शिवसैनकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा दानवे यांचा प्रयत्न यशस्वी होणार नाही. मी शिवसेनेचा सच्चा निष्ठावान सैनिक आहे, काँग्रेसमध्ये कदापी जाणार नाही," असा खुलासा शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी 'सरकारनामा'शी बोलतांना केला.

जालना लोकसभा मतदारसंघातुन रावसाहेब दानवे यांच्या विरोधात अर्जून खोतकर निवडणूक लढवणार याचा पुनरुच्चार खोतकर यांनी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत औरंगाबाद येथे झालेल्या बैठकी नंतर केला होता. त्यामुळे जालना जिल्ह्यातील राजकारण अधिकच तापले. अर्जुनाच्या बाणाने दानवाचा वध करणारच आशा भाषेत खोतकर यांनी दानवे यांना डिवचले. त्यावर जालन्यातील एका कार्यक्रमात रविवारी दानवेंनी खोतकरांवर पलटवार केला. अर्जुन खोतकर काँगेसमध्ये जाणार असा खळबळजनक आरोप त्यांनी केला.

या संदर्भात सरकारनामा प्रतिनिधीने खोतकर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, "हा आरोप निखालस खोटा आहे. माझी उमेदवारी निश्चित असल्याने दानवे बिथरले आहेत. २०१९ च्या निवडणुकीत दानवाचा वध बाणाने होणारच आहे. त्यामुळे शिवसैनिकांमध्ये संभ्रम निर्माण करून त्यांची दिशाभूल करण्याचा नीच डाव रावसाहेब दानवे खेळत आहेत. पण त्याला शिवसैनिक बळी पडणार नाहीत. काँगेसमध्ये जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. मी जुना, निष्ठावंत  शिवसैनक आहे, पक्षाने मला भरभरून दिले आहे." राहायला प्रश्न दानवे यांनी मी काँग्रेसमध्ये जाणार या आरोपाचा तर त्याला मी जाहीर सभेतून उत्तर देईनच, असा इशारा देखील अर्जुन खोतकर यांनी दिला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com