डॉ.अर्चना पाटील यांची राष्ट्रीय समाज पक्षाच्या प्रदेश सचिवपदी निवड - Marathi Political News Arhana Patil RSP Secretary | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

उर्मिला मातोंडकर मातोश्रीवर दाखल

डॉ.अर्चना पाटील यांची राष्ट्रीय समाज पक्षाच्या प्रदेश सचिवपदी निवड

राजकुमार थोरात
सोमवार, 30 एप्रिल 2018

लासुर्णे (ता.इंदापूर) येथील डॉ.अर्चना उत्तमराव पाटील यांची राष्ट्रीय समाज पक्षाच्या प्रदेश सचिवपदी यांची निवड झाली आहे. 

वालचंदनगर : लासुर्णे (ता.इंदापूर) येथील डॉ.अर्चना उत्तमराव पाटील यांची राष्ट्रीय समाज पक्षाच्या प्रदेश सचिवपदी यांची निवड झाली आहे. 

डॉ. पाटील या उच्चशिक्षित अाहेत. लासुर्णे गावातील पाटील घराण्याला राजकीय वारसा आहे. निवडीसंदर्भात पाटील यांनी सांगितले की, राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष, राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास, मत्स्यविकास मंत्री महादेव जानकर यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाची धोरणे सर्वसामान्य नागरिकांपर्यत पोचवून त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न केला जाईल. तसेच पक्षवाढीसाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख