आदित्य ठाकरेंच्या आदेशाने सेना भवनमध्ये प्लास्टिक बंदी !

काही दिवसांपूर्वी एका बैठकीत शिवसेना भवनमधील कर्मचा-यांनी नेहमीच्या पद्धतीने पाण्याच्या बाटल्या दिल्या. या बाटल्या पाहताच आदित्य ठाकरे यांनी कर्मचारी व सेना भवनची व्यवस्था पाहणा-या पदाधिका-यांना या प्लास्टीकच्या बाटल्या बंद करण्याच्या सुचना केल्या. राज्यात प्लास्टिक बंदी झालेली आहे. त्यामुळे येथून पुढे सेना भवनमध्ये प्लास्टिक बाटल्या दिसता कामा नये, अशी ताकीदच ठाकरे यांनी दिली.
आदित्य ठाकरेंच्या आदेशाने सेना भवनमध्ये प्लास्टिक बंदी !

मुंबई : काही दिवसांपूर्वी एका बैठकीत शिवसेना भवनमधील कर्मचा-यांनी नेहमीच्या पद्धतीने पाण्याच्या बाटल्या दिल्या. या बाटल्या पाहताच आदित्य ठाकरे यांनी कर्मचारी व सेना भवनची व्यवस्था पाहणा-या पदाधिका-यांना या प्लास्टीकच्या बाटल्या बंद करण्याच्या सुचना केल्या. राज्यात प्लास्टिक बंदी झालेली आहे. त्यामुळे येथून पुढे सेना भवनमध्ये प्लास्टिक बाटल्या दिसता कामा नये, अशी ताकीदच ठाकरे यांनी दिली. त्यामुळे शिवसेना भवनमध्ये पाण्याच्या बाटल्याच काय, पण प्लास्टिकच्या पिशव्या सुद्धा दिसायच्या बंद झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

प्लास्टिक बंदीचा निर्णय सर्वसामान्य जनता, सरकार यांनी अजून गांभिर्याने घेतलेला नाही. पण युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी मात्र प्लास्टिक बंदीसाठी कसून प्रयत्न सुरू केले आहेत. राज्य सरकारचे पर्यावरण खाते शिवसेनेकडे आहे. रामदास कदम हे या खात्याचे मंत्री आहेत. त्या अनुषंगाने आदित्य ठाकरे यांनीच प्लास्टिकवर बंदी आणण्यासाठी रामदास कदम यांना सुचना केली होती. या सुचनेनुसार राज्यात प्लास्टिक बंदीचा निर्णय घेण्यात आला आहे.

प्लास्टिक बंदीचा निर्णय झाला असला तरी त्याची अद्याप ठोस अंमलबजावणी होऊ शकलेली नाही. ही अंमलबजावणी व्हावी यासाठी स्वतः आदित्य ठाकरे पर्यावरण विभागाकडे पाठपुरावा करीत आहेत. त्यामुळे त्यांना जिथे कुठे प्लास्टिकचा वापर दिसतो, तिथे ते लगेच संबंधितांना हटकतात. याच अनुषंगाने त्यांनी सेना भवनमध्ये प्लास्टिक बंदी यशस्वी केली असल्याचे सूत्रांनी सांगितले.   

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com