marathakranti morcha and band | Sarkarnama

घनसावंगीत पोलिस ठाण्यावर हल्ला, वाहनांची प्रचंड जाळपोळ

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 24 जुलै 2018

घनसावंगी : जालना जिल्ह्यातील घनसावंगी येथे मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनाला आज हिंसक वळण लागले. रास्ता रोको आंदोलन सुरू असताना जमाव आक्रमक झाला व त्यांनी प्रचंड दगडफेक सुरू केली. त्यानंतर घोषणाबाजी करत हा जमाव पोलीस ठाण्यावर चाल करून गेला. तिथे उभी असलेली पोलीस व्हॅन पेटवून देत पोलीस ठाण्याची देखील तोडफोड केली. या हल्यात चार ते पाच पोलिस कर्मचारी जखमी झाले आहेत. जमाव अधिकच हिंसक झाल्यामुळे पोलिसांनी आधी अश्रुधुराच्या नळकांड्या व नंतर हवेत गोळीबार केला. 

दरम्यान, महाराष्ट्र बॅंकेच्या बाजूला असलेली अंबड नगर परिषदेची अग्निशमनदलाची गाडीही आंदोलकांनी पेटवून दिली. मराठा क्रांती मोर्चाने महाराष्ट्र बंदची हाक दिल्यानंतर सर्वत्र कडकडीत बंद पाळण्यात येत आहे. याचवेळी घनसावंगी येथे रास्तारोको दरम्यान प्रचंड दगडफेक सुरू झाल्याने लोक सैरभैर झाले. अनेक दुकानांवर व घरांवर देखील प्रचंड दगडफेक झाली. 

रास्तारोको दरम्यान, आंदोलकांनी दोन दुचाकी व एक रिक्षा जाळली. शहरात सर्वत्र तणाव असून नागरिक भयभीत झाले आहेत. जाळपोळ करत मोर्चा तहसील कार्यालयावर चाल करून गेला. जमावाने तहसीलवरही दगडफेक करत कार्यालय फोडले. यावेळी जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधूराच्या नळकांड्या फोडून हवेत गोळीबार केला. सध्या या ठिकाणी एसआरपीएफच्या जवानांच्या तुकडीला पाचारण करण्यात आले आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख