maratha sanghtana compares khaire and gavit | Sarkarnama

जे खासदार खैरेंना जमले ते हिना गावित यांनी का केले नाही : मराठा संघटनांचा सवाल

निखिल सूर्यवंशी
मंगळवार, 7 ऑगस्ट 2018

धुळे : मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून राज्यात लोकप्रतिनिधींना आंदोलक जाब विचारत आहेत. त्याचा फटका काहींना बसला. शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे यांना या आंदोलनाच्या निमित्ताने धक्काबुक्की झाली. भाजपच्या आमदार मेधा कुलकर्णी यांना मानसिक त्रास झाला. भाजपच्या खासदार हिना गावित यांच्याही गाडीवर हल्ला झाला. 

असे असले तरी बऱयाच लोकप्रतिनिधींनी सामंजस्याची भूमिका घेत आंदोलकांना धारेवर धरले नाही. मात्र हिना गावित यांनी आंदोलकांवर थेट अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यासोबत खुनाच्या प्रयत्नाचाही गुन्हा दाखल केला. त्यामुळे याबाबत मराठा संघटनांनी आता त्यांना प्रश्न विचारला आहे. 

 आरक्षणप्रश्‍नी धुळे जिल्हा मराठा क्रांती मोर्चातर्फे 18 दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनात 16 व्या दिवशी रविवारी अतिउत्साही आंदोलकांकडून भाजपच्या संसदरत्न खासदार डॉ. हीना गावित यांच्या कारची तोडफोड झाली. त्याविषयी दिलगिरी व्यक्त केली. मात्र, त्यांच्याकडून ठार मारण्यासंबंधी खोटा गुन्हा दाखल होतानाच "ऍट्रॉसिटी'चाही गैरवापर झाला. या प्रकाराचा निषेध, धिक्कार करत असल्याची भूमिका मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी आज (मंगळवारी) सायंकाळी पत्रकार परिषदेत मांडली. 

क्रांती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मनोज मोरे यांनी खासदार डॉ. गावित यांच्या संसदेतील भाषणासह भूमिकेवर कडाडून हल्ला चढविला. ते म्हणाले, औरंगाबादला खासदार चंद्रकांत खैरे यांनी आंदोलकांचा रोष पत्करूनही आंदोलनाच्या भावना जाणून घेतल्या. तसेच या आंदोलनात बलिदान केलेल्या शिंदे परिवाराला मदत केली. हा आदर्श समोर ठेवण्याऐवजी, धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ आरक्षणप्रश्नी बलिदान देणाऱ्यांच्या नामफलकापुढे श्रद्धांजलीसाठी खासदार डॉ. गावित येऊ शकल्या नाहीत, त्याचे काय? 
 
अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख