maratha reservation sanjay raut attack cm | Sarkarnama

महाराष्ट्र पेटला असताना राज्याच्या पडद्यावरून सरकार गायब : संजय राऊत 

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 25 जुलै 2018

पुणे : महाराष्ट्र पेटला असताना राज्याच्या पडद्यावरून सरकार गायब झाले असल्याचा टीका शिवसेनेचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी आज केला. 

पुणे : महाराष्ट्र पेटला असताना राज्याच्या पडद्यावरून सरकार गायब झाले असल्याचा टीका शिवसेनेचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी आज केला. 

पत्रकारांशी बोलताना संजय राऊत यांनी भाजपवर टीका केली. ते म्हणाले, की महाराष्ट्र पेटत असताना सरकारने बघ्याची भूमिका घेऊ नये. मराठा समाज आपल्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरला आहे. त्यांच्या मागणीकडे सरकारने गंभीरपणे पाहिले पाहिजे. या समाजाला न्याय मिळाला पाहिजे. अयोध्येतील राम मंदिराबरोबर मराठ्यांना आरक्षण कसे मिळेल हे सरकारने पाहिले पाहिजे. ती त्यांची जबाबदारी आहे. मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी मराठा आंदोलनाबाबत जे विधान केले तेही धक्कादायक होते. 

दरम्यान, मराठा समाजाने आरक्षणासह केलेल्या आंदोलनाला शिवसेनेने पाठिंब दिला असून सरकारने त्यांच्या मागण्याबाबत सरकारने तातडीने निर्णय घेण्याची मागणी सरकारकडे केली आहे.  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख