maratha reservation congress mla ready to resign | Sarkarnama

मराठा आरक्षणासाठी कॉंग्रेस आमदारांचा राजीनाम्याचा आग्रह 

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 30 जुलै 2018

मुंबई : राज्यात मराठा समाज रस्त्यावर उतरून आरक्षणासाठी संतप्त झाला असताना आता राजकीय पक्षांच्या व्यासपीठावर हा रोष समोर येऊ लागला आहे. मराठा आरक्षण तसेच आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचा दबाव म्हणून सर्व कॉंग्रेस आमदारांनी सामूहिक राजीनामे देण्याचा आग्रह सोमवारच्या बैठकीत धरला. 

आरक्षणाबाबतीत पक्षाची भूमिका समाजासोबत असायला हवी. सरकार आंदोलनाला अद्याप गंभीरपणे घेत नसल्याने संताप वाढत आहे. पाच मराठा आंदोलकांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यामुळे कॉंग्रेसच्या सर्व आमदारांना राजीनामे देण्यास परवानगी द्या, अशी मागणीच विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, आमदार भारत भालके व अब्दुल सत्तार यांनी बैठकीत केली; मात्र सरकार एक दिवसाचे अधिवेशन घेणार आहे. त्या वेळी आमदारांची भूमिका महत्त्वाची असल्याचे काहींचे मत होते. 

निर्णय झालेला नाही : चव्हाण 
कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी आमदारांच्या राजीनाम्याबाबत बोलताना सांगितले की, आमदारांच्या भावना तीव्र आहेत; मात्र सर्व आमदारांनी राजीनामे द्यावेत, असा कोणताही निर्णय झालेला नाही. याबाबत मतभेद आहेत. विशेष अधिवेशनात मराठा आरक्षणाच्या कायद्यासाठी सभागृहात सरकारला भाग पाडले पाहिजे. जाब विचारला पाहिजे, अशी पक्षाची भूमिका आहे, असे चव्हाण यांनी स्पष्ट केले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख