मराठा आरक्षणाची उद्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

मराठा आरक्षणाची उद्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

औरंगाबाद : मराठा आरक्षणाचे प्रकरण सध्या सर्वोच्च न्यायालयात असून, मंगळवारी (ता. 19) सुनावणी होणार आहे. भारताचे मुख्य न्यायाधीश यांच्या खंडपीठासमोर सकारात्मक भूमिका मांडण्यात यावी, यासाठी मुख्य सचिवांना सूचना कराव्यात, अशी विनंती राज्यपाल भगतसिंग कोशियारी यांना याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी केली आहे. 

मराठा क्रांती मोर्चानंतर आणखीनच आक्रमक झालेला मराठा आरक्षणाचा लढा सध्या सर्वोच्च न्यायालयात पोचला आहे. तत्पूर्वी 9 ऑगस्ट 2016 मध्ये काढलेल्या मराठा क्रांती मोर्चाने राज्यभरातील वातावरण ढवळून निघाले होते. त्यानंतर 29 नोव्हेंबर 2018 ला राज्य सरकारतर्फे विधिमंडळात 16 टक्‍के मराठा आरक्षणाचे विधेयक एकमुखी मंजूर झाले. त्यानंतर उच्च न्यायालयानेही 28 जून 2019 ला 12-13 टक्‍के आरक्षण कायम केले. आता हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात आहे. 

नेमके काय आहे पत्रात 
विनोद पाटील यांनी रविवारी (ता. 17) राज्यपालांना पत्र लिहिले आहे. यात म्हटले आहे, की दिल्ली येथे सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाबाबत 19 नोव्हेंबरला सुनावणी ठेवण्यात आली आहे. भारताचे मुख्य न्यायाधीश यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होईल. या सुनावणीदरम्यान, महाराष्ट्राच्या वतीने मराठा आरक्षणाची सकारात्मक भूमिका मांडण्यात यावी, अशा प्रकारच्या सूचना राज्याच्या मुख्य सचिवांना देण्यात याव्यात. सुनावणीदरम्यान, योग्य त्या विधिज्ञांना महाराष्ट्राच्या वतीने मराठा आरक्षणाची बाजू मांडण्यासाठी उभे करावे, अशी विनंती पत्राद्वारे करण्यात आली आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com