maratha reservation and high court | Sarkarnama

मराठा समाजाच्या आरक्षणाच्या समर्थनार्थ राजेंद्र दाते यांच्याकडूनही कॅव्हेट दाखल

सरकारनामा ब्युरो
रविवार, 2 डिसेंबर 2018

औरंगाबाद : राज्य सरकारने मराठा समाजाला 16 टक्के स्वतंत्र आरक्षण देण्याचा निर्णय जाहीर करत त्याचे विधेयक आणि अधिसूचनाही काढली. मराठा आरक्षणाच्या कायदा झाला असतांना देखील या विरोधात काही व्यक्ती, संस्था, संघटनांकडून उच्च न्यायालयात आव्हान याचिका दाखल होऊ शकते. ही शक्‍यता लक्षात घेऊन मुंबई उच्च न्यायालयातील मुख्य हस्तक्षेप याचिकाकर्ते व मराठा आरक्षणाचे अभ्यासक राजेंद्र दाते पाटील यांनी मुंबई व औरंगाबाद उच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल केले आहे. 

राज्य मागासवर्ग आयोगाच्या अहवालानंतर राज्य सरकारच्या वतीने हिवाळी अधिवेशना दरम्यान विधिमंडळाच्या सभागृहात एटीआर (कृती आराखडा) सादर करण्यात आला होता. त्याआधारे मराठा समाजाला स्वतंत्र 16 टक्के शैक्षणिक व नोकरीत आरक्षण देण्याचे विधेयक सर्वानुमते मंजुर करून राज्यपालांच्या स्वाक्षरीनंतर त्याचे कायद्यात रुपांतर करण्यात आले. मराठा आरक्षणाचा कायदा झाल्यानंतर त्याची अधिसूचना काढून अंमलबजावणी देखील सुरू करण्यात आली आहे. 

परंतु मराठा आरक्षण आणि त्यासाठी तयार करण्यात आलेल्या कायद्याच्या विरोधात काही व्यक्ती, संघटना, संस्था न्यायालयात जाण्याच्या तयारीत आहेत. हीच बाब लक्षात घेत राजेंद्र दाते पाटील यांनी विलास पांगारकर यांच्या मदतीने न्यायालयाने दिलेल्या विशेष मुभेच्या आधारे मुंबई तसेच औरंगाबाद उच्च न्यायालयात परिपुर्ण, कायदेशीर कॅव्हेट दाखल केले. या संदर्भात बोलतांना दाते पाटील म्हणाले, संपुर्ण कायदेशीर बाबी तपासल्यानंतरच कॅव्हेट दाखल करण्याचा आम्ही निर्णय घेतला. जेणेकरून न्यायालयात ते टिकेल. 

यासाठी त्यांना किशोर चव्हाण, अशोक खानापुरे, इंजि.तानाजी हुस्सेकर, निखिल पांगारकर, योगेश केवारे,अशोक वाघ, अंबादास काचोळे, नितीन कदम, नाना कदम, माधव आवरगंड, संपत पगार, आण्णासाहेब खाडे, डॉ.उद्धव काळे, प्रा.राजकुमार गाजरे आदींचे सहकार्य लाभले. 
 
अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख