Maratha Reservation Agitation Nashik Bandh | Sarkarnama

नाशिक जिल्ह्यात मराठा आरक्षणासाठी उस्फुर्त बंद 

सरकारनामा ब्युरो 
मंगळवार, 24 जुलै 2018

नाशिक : मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला जिल्ह्यात उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी विविध भागात बंद पुकारण्यात आला. औरंगाबादला जाणारी बससेवा बंद ठेवण्यात आली. तर काही वाहने येवला व वैजापुर शहरालगत रोखण्यात आली. नांदगाव, निफाड, इगतपुरी, मनमाड यांसह विविध ठिकाणी सर्व पक्षीय शिष्टमंडळाने निवेदन देऊन आरक्षणाच्या मागणीला पाठींबा दिला. 

यासंदर्भात नाशिक शहरात मराठा क्रांती मोर्चा समितीची बैठक झाली. त्याला मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. समन्वयक चंद्रकांत बनकर व अन्य पदाधिकाऱ्यांनी यावेळी मागण्यांसाठी आंदोलनावर ठाम असल्याचे सांगीतले. मात्र कोणत्याही स्थितीत शांतता भंग होऊ देऊ नये याची खबरदारी घेण्याचे आवाहन केले. दरम्यान विविध दिंड्या तसेच आषाढी यात्रेसाठी पंढरपुरला गेलेले वारकरी आज सकाळपासुनच शहरात परतु लागले आहेत. त्यांना विविध भागात कार्यकर्त्यांनी मदत केली. मात्र बंदचा परिणाम बससेवेवर दिसून आला असुन खबरदारीचा उपाय म्हणुन परिवहन महामंडळाने मर्यादीत सेवा सुरु ठेवली आहे. 

साकोरा (नांदगाव) येथे अज्ञात नागरीकांनी रस्त्यावर टायर जाळले. त्यामुळे काही काळ वाहतुक ठप्प झाली. मात्र पोलिसांनी हस्तक्षेप करुन परिस्थिती पुर्वपदावर आणली. नैताळे शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. सिन्नर शिर्डी महामार्गावर साकूरफाटा (ता. इगतपुरी) येथे बंद पाळण्यात आला. सटाणा, नामपूर येथेही बंदला चांगला प्रतिसाद मिळाला. ग्रामीण भागात उस्फुर्त तर शहरी भागात संमिश्र बंद होता. त्यामुळे पोलिस बंदोबस्त अधिक कडक करण्यात आला आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख