Maratha Reservation Aandolan Solapur | Sarkarnama

माचणुर चौकात चक्का जाम आंदोलन : सहकार मंत्री सुभाष देशमुख यांना घेरले

दावल इनामदार
रविवार, 22 जुलै 2018

पंढरपूर आषाढीच्या पर्श्वभूमीवर सर्वत्र चक्का जाम अदोलन सूरू असून सकल मराठा समाजाच्या वतीने माचणुर (ता .मंगळवेढा) येथे सोलापूर- कोल्हापूर या राष्ट्रीय महामार्गवरील चौकामधे दोन तास रस्ता रोको करून चक्का जाम आदोलन करण्यात आले. सहकारमंत्री सुभाष देशमुख यांना आंदोलनकर्त्यांनी घेरले

ब्रह्मपुरी : पंढरपूर आषाढीच्या पर्श्वभूमीवर सर्वत्र चक्का जाम अदोलन सूरू असून सकल मराठा समाजाच्या वतीने माचणुर (ता .मंगळवेढा) येथे सोलापूर- कोल्हापूर या राष्ट्रीय महामार्गवरील चौकामधे दोन तास रस्ता रोको करून चक्का जाम आदोलन करण्यात आले. सहकारमंत्री सुभाष देशमुख यांना आंदोलनकर्त्यांनी घेरले व त्यांच्या वाहनास चौकात अडविल्यामुळे या महामार्गवरील प्रवाशांची गैरसोय झाली.

सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांना त्वरित फोन केला व मराठा समाजाच्या आरक्षण सोडविण्यात येईल, या समाजाच्या पाठीशी आमचे सरकार राहील अशी ग्वाही देऊन चक्का जाम आन्दोलनातून सुटका करुन घेतली.

या आंदोलनामुळे प्रवासी ,माल वाहतूक विस्कळीत झाली होती. या आदोलना मध्ये ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराज की जय..., एक मराठा लाख मराठा....., कोण म्हणतंय देत नाही, घेतल्या शिवाय राहत नाही..... आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं.....अशा घोषणा मराठा समाज बांधवाकडून यावेळी देण्यात आल्या. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख