maratha kranti morcha warns raut and aavhad | Sarkarnama

आव्हाड, राऊत " मिळतील तिथे ठोकून काढू' : मराठा क्रांती मोर्चाचा इशारा

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 15 जानेवारी 2020

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज, माजी खासदार व भाजप नेते उदयनराजे भोसले यांच्या बचावासाठी मराठा क्रांती मोर्चाने उडी घेतली आहे. उदयनराजे भोसले यांच्या विरोधात लिखाण करणाऱ्या "सामना'चे संपादक व खासदार संजय राऊत, तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते व कॅबिनेटमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात आगपाखड करत "मिळतील तिथे ठोकून काढू', असा गर्भित इशारा मराठा क्रांती मोर्चाने दिला आहे. 

मुंबई मराठी पत्रकार संघात बुधवारी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक अंकुश कदम यांनी हा इशारा दिला आहे. दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी करण्यात आल्याने त्याविषयी भगवान गोयल या लेखकाच्या विरोधातही मराठा मोर्चाकडून गंभीर इशारा देण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांची कोणीही बरोबरी करू शकत नाही. मात्र असा प्रकार यापुढेही घडल्यास त्याची मराठा मोर्चा आपल्या शैलीत दखल घेईल, असेही कदम यांनी सांगितले. 

शिवसेना नेते संजय राऊत यांनी नुकतेच छत्रपती उदयनराजे भोसले यांनी आपण शिवाजी महाराजांचे वंशज असल्याचा पुरावा द्यावा असे विधान केले होते, तर राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी शिवाजी महाराजांचे नाव ठेवण्यासाठी साताऱ्यातून परवानगी घ्यायची गरज काय, असे विधान केले होते. त्यावर मराठी क्रांती मोर्चाने तीव्र आक्षेप घेतला आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख