maratha kranti morcha reject cm letter | Sarkarnama

मराठा आरक्षण आंदोलन सुरूच ठेवणार , मुख्यमंत्र्यांनी घेतलेले निर्णय अमान्य

सरकारनामा ब्युरो
रविवार, 29 जुलै 2018

बीड : परळी येथील उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरु असलेले सकल मराठा क्रांती ठोक मोर्चाचे आंदोलन रविवार (ता.29) बाराव्या दिवशीही कायम आहे. दुपारी एकच्या सुमारास मुख्यमंत्र्यांनी घेतलेले निर्णय आणि आंदोलन मागे घेण्याचे आवाहन करणारे लेखी पत्र घेवून विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर हे स्वतः आंदोलनस्थळी आले होते. परंतु पत्रातील काही मुद्यावर आक्षेप नोंदवत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय आंदोलकांनी घेतल्याने विभागीय आयुक्तांची शिष्टाई निष्फळ ठरली 

गेल्या दहा-बारा दिवसांपासून परळीसह राज्यात मराठा आरक्षणाच्या मागणीवरून आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला अनेक जिल्ह्यात हिंसक वळण लागले, तर काही ठिकाणी आंदोलक तरुणांनी आत्महत्याही केल्या. या पार्श्‍वभूमीवर मराठा आरक्षणा संदर्भात सरकारने काही निर्णय घेतले. या निर्णयाची माहिती देणारे लेखी पत्र घेऊन आंदोलनाचे संयोजक आबासाहेब पाटील यांच्याकडे विभागीय आयुक्तांनी दिले. 

पाटील यांनी देखील आपल्या मागण्या सविस्तर भापकर यांच्या समोर मांडल्या. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या पत्राचा अभ्यास करण्यासाठी आंदोलकांनी वेळ मागितला. साधारणतः दीड तासानंतर उपजिल्हाधिकारी कांबळे पुन्हा आंदोलनस्थळी आले. तेव्हा पत्रातील काही मुद्यावर आपला आक्षेप असल्याचे सांगितले. यात प्रामुख्याने आंदोलकावरील गुन्हे मागे घेणार असे सांगतानाच पोलीसावर हल्ला करणारे व सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणारे वगळून असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे. मेगा नोकरभरती संदर्भातील मुद्दा, तसेच मागासवर्गीय आयोगाचा अहवाल आल्यानंतर अधिवेशन घेण्यात येईल असेही स्पष्ट करण्यात आले. 

परंतु मागासवर्गीय आयोग आपला अहवाल कधी सादर करणार ? त्यासाठी किती दिवस लागतील ? याचा स्पष्ट उल्लेख पत्रात करावा अशी मागणी आंदोलनाच्या समन्वयकांनी केली. तसेच जोपर्यंत आमच्या सर्व मागण्यांचे समाधान होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचे संयोजक पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सांगितले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख