maratha kranti morcha and mundanda | Sarkarnama

मराठा आरक्षण मागणीला मुंदडांचाही पाठिंबा

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 3 ऑगस्ट 2018

बीड : जिल्ह्यात मराठा आरक्षण मागणीचे आंदोलन दिवसेंदिवस जोर धरत आहे. विविध मार्गांनी आंदोलने होत असून मराठा समाजाच्या आरक्षण मागणीला विविध स्तरांतून पाठींबा मिळत आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जेष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा यांनीही ठिय्या आंदोलनात सहभाग घेत या मागणीला पाठींबा दिला. मराठा आरक्षणाच्या मुद्याने जिल्ह्यात पेटलेल्या वातीने राज्यभर वणव्याचे रुप घेतले. परळीत सुरु असलेले ठिय्या आंदोलन सतराव्या दिवशीही सुरुच आहे. 

जिल्ह्यात रोज कुठे ना कुठे ठिय्या, रास्ता रोको, धरणे, जागरण गोंधळ अशी आंदोलने सुरुच आहेत. दरम्यान, मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीला राजकीय नेत्यांसह विविध समाज घटकांनीही पाठिंबा देण्यास सुरुवात केली आहे. केज मतदार संघातील राष्ट्रवादीचे नेते नंदकिशोर मुंदडा यांनीही आंदोलनाला आणि आरक्षण मागणीला पाठिंबा दिला आहे. काही दिवसांपूर्वी परळी येथील ठिय्या आंदोलनाला भेट देऊन अक्षय मुंदडा यांनी या मागणीला पाठिंबा दिला होता. तर, अंबाजोगाई येथे गेल्या आठवड्यात झालेल्या धरणे आंदोलनात जेष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा यांनी सहभाग घेतला होता. शुक्रवारी केजमध्ये सकल मराठा समाजाच्या वतीने ठिय्या आंदोलन सुरु झाले असून यामध्ये नंदकिशोर मुंदडा यांनी सहभाग घेत आरक्षण मागणीच्या पाठिंब्याचा पुनरुच्चार केला. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख