maratha kranti morcha and mp from maharashtra | Sarkarnama

मराठा आरक्षणाचा मुद्दा संसदेत उपस्थित

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 24 जुलै 2018

नवी दिल्ली : राज्यात मराठा आरक्षणावरून निर्माण झालेल्या तणावजन्य परिस्थितीचे पडसाद आज संसदेत उमटले. राज्यसभेत छत्रपती संभाजीराजे यांनी हा मुद्दा उपस्थित केला तर लोकसभेत शिवसेनेचे खासदार विनायक राऊत आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे खासदार धनंजय महाडिक यांनी हा मुद्दा उपस्थित केला. लोकसभेत बोलताना राऊत यांनी औरंगाबाद जिल्ह्यातील काकासाहेब शिंदे या तरुणाने घेतलेल्या जलसमाधीच्या घटनेचा सगळा वृन्तांत कथन करून पोलिस आणि प्रशासन यांनी कसे दुर्लक्ष केले त्याकडे लक्ष वेधले. त्यांना पाठिंबा देणारे व या प्रश्‍नांकडे लक्ष द्यावे अशी मागणी करत धनंजय महाडिक यांनीही या विषयावर भाषण केले. 

मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावा अशी मागणी राज्यसभेत संभाजीराजे यांनी केली. ते म्हणाले, महाराष्ट्रातील मराठा समाजाच्या भावना अत्यंत तीव्र झाल्या असून मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा त्वरित मार्गी लावावा. छत्रपती शाहू महाराजांनी 1902 साली बहुजन समाजाला आरक्षण दिले होते यामध्ये मराठा समाजाचा देखील समावेश होता. स्वातंत्र्यानंतर मराठा समाजाला आरक्षण न दिल्यामुळे मराठा समाजाचे आर्थिक आणि सामाजिक नुकसान झाले आहे. यासंदर्भात गेल्या वर्षी निघालेल्या ऐतिहासिक मराठा मोर्चाची दखल संपूर्ण जगानी दखल घेतली होती. महाराष्ट्रात आज अत्यंत वाईट परिस्थिती निर्माण झाली ही परिस्थिती अधिक चिघळू नये महणून मराठा समाजासाठी ज्या लोकांनी प्रमुख लढा दिला त्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्वरित चर्चेसाठी बोलवावे आणि त्यांच्या मागण्या ऐकून हा प्रश्न मार्गी लावावा. त्याचप्रमाणे मराठा आरक्षणाच्या मुद्यावर सर्वच राजकीय पक्षांनी एकत्र येऊन राजकारणाच्या पलीकडे जाऊन मराठा समाजाच्या मागण्या मार्गी लावाव्यात असेही त्यांनी सांगितले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख