maratha kranti morcha and aurangabad | Sarkarnama

मराठा क्रांती मोर्चा समन्वयकांना पोलिस संरक्षण देण्याची मागणी

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 31 जुलै 2018

परळी वैजनाथ : मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या समन्वयकांच्या जीविताला धोका आहे, या सर्व समन्यवयकांना पोलीस संरक्षण देण्याची मागणी मराठा क्रांती ठोक मोर्चाचे राज्य समन्वयक आबासाहेब पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे मंगळवारी केली आहे. परळी येथे उपविभागीय कार्यालयासमोर मागील चौदा दिवसांपासून मराठा क्रांती ठोक मोर्चाचे ठिय्या आंदोलन सुरू आहे. राज्यभर लोकशाही मार्गाने शांततेत ठिय्या आंदोलन जाहीर केले होते.यातून महाराष्ट्रात सर्व जिल्ह्यात शांततेत आंदोलन सुरू असताना, काही वाईट शक्ती या आंदोलनात घुसून मराठा समाजाचे नाव बदनाम करत आहेत.

परळी वैजनाथ : मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या समन्वयकांच्या जीविताला धोका आहे, या सर्व समन्यवयकांना पोलीस संरक्षण देण्याची मागणी मराठा क्रांती ठोक मोर्चाचे राज्य समन्वयक आबासाहेब पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे मंगळवारी केली आहे. परळी येथे उपविभागीय कार्यालयासमोर मागील चौदा दिवसांपासून मराठा क्रांती ठोक मोर्चाचे ठिय्या आंदोलन सुरू आहे. राज्यभर लोकशाही मार्गाने शांततेत ठिय्या आंदोलन जाहीर केले होते.यातून महाराष्ट्रात सर्व जिल्ह्यात शांततेत आंदोलन सुरू असताना, काही वाईट शक्ती या आंदोलनात घुसून मराठा समाजाचे नाव बदनाम करत आहेत. काही इतर लोक आंदोलनात सहभागी होत आहेत.मराठा क्रांती ठोक मोर्चाचे आंदोलन हिंसक बनवून समाजात अशांतता पसरवत आहेत.यातून मराठा क्रांती मोर्च्याच्या समन्यवयकांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. 

मराठा क्रांती मोर्चा आंदोलनाचे प्रमुख आंदोलक म्हणून आबासाहेब पाटील (पुणे),रमेश केरे पाटील (औरंगाबाद), महेश डोंगरे (सोलापूर), विवेकानंद बाबर (सातारा), सुनील नागणे (तुळजापूर), संजय सावंत (परळी), आप्पासाहेब कुढेकर (औरंगाबाद), संतोष सुर्यराव (ठाणे), अमित घाडगे (परळी) या समन्यवयकांना तात्काळ विना मोबदला पोलीस संरक्षण कायमस्वरुपी देण्यात यावे, अशी मागणी मुख्यमंत्री यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. हे निवेदन येथील तहसीलदार, पोलीस महासंचालक मुंबई यांना देण्यात आले आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख