maratha kranti moracha | Sarkarnama

मराठा समाज आरक्षणासाठी कुटुंबासह रस्त्यावर उतरेल, राज्यस्तरीय बैठकीत समन्वयकांचा इशारा

हरी तुगावकर
रविवार, 29 जुलै 2018

लातूर : मराठा समजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, या मागणी करीता गेल्या काही दिवसापासून आंदोलन सुरु आहे. या पुढील काळात हे आंदोलन अधिक 
तीव्र करण्यात येईल. शासनाने मराठा समाजाचा अंत पाहू नये. तातडीने मागण्या मान्य कराव्यात अन्यथा येत्या काळात मराठा समाज गुरंढोरं तसेच कुटुंबासह रस्त्यावर उतरेल. त्याचा उद्रेक होईल, असा इशारा येथे रविवारी आयोजित मराठा क्रांती मोर्चाच्या बैठकीत अनेक जिल्हा समन्वयकांनी दिला आहे. 

मराठा आरक्षणाच्या संदर्भात सकाळी या राज्यस्तरीय बैठकीला सुरवात झाली आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील समन्वयक या बैठकील उपस्थितीत आहेत. आतापर्यंत झालेल्या आंदोलनाचा जिल्हानिहाय आढावा हे समन्वयक देत आहेत. तसेच पुढच्या आंदोलनाची दिशाही देखील ते मांडत आहेत. दुपारी दोनपर्यंत औरंगाबाद, यवतमाळ, नाशिक, वाशिम, बुलढाणा, पुणे, अमरावती अशा विविध जिल्ह्यातील समन्वयकांनी आपले मत या बैठकीत मांडले आहे. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आतापर्यंत जे आंदोलन सुरु आहे. यात फक्त प्रमुख पदाधिकारी, तरुणच उतरले आहेत. आंदोलनकर्त्याच्या भावना तीव्र आहेत. हे लक्षात घेवून राज्य शासनाने तातडीने मराठा क्रांती 
मोर्चाच्या मागण्या कराव्यात. मराठा समाजाचा शासनाने अंत पाहू नये. आता या पुढे मराठा समाज गुरंढोरं तसेच कुटुंब रस्त्यावर आणून आंदोलन करेल असा इशाराही या बैठकीत हे समन्वयकांनी दिला आहे. दिवसभर ही बैठक चालणार आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख