Maratha karnti morcha workers should keeep restrain : Upadhyaay | Sarkarnama

आंदोलकांनी कायदा हातात घेऊ नये : कृष्णकांत उपाध्याय

गणेश पांडे
बुधवार, 8 ऑगस्ट 2018

बंद दरम्यान सहा उपविभागीय पोलिस अधिकारी, 14 पोलिस निरीक्षक, 66 सहायक पोलिस निरीक्षक व पोलिस उपनिरीक्षक, 944 पोलिस कर्मचारी, 11 स्ट्रॉयकींग फोर्स, 2 आरसीपी प्लॉटून, 2 क्विक रिसन्पॉन्स टीम, 450 होमगार्ड, 40 साध्या वेशातील पोलिस, 2 सशस्त्र पोलिस फोर्स देण्यात आला आहे. 

परभणी  : गुरुवारी होणाऱ्या आंदोलना दरम्यान कोणही कायदा हातात घेऊ नये, शासनस्तरावर आरक्षणाच्या मागणीची सकारात्मक रित्या चर्चा सुरु आहे. त्यामुळे आंदोलकांनी शांतता राखावी, सर्वसामान्य नागरीकांना त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी, सर्वसामान्य नागरीकांच्या सुरक्षिततेसाठी पोलिस सदैव तत्पर आहेत, सर्वांनी संयम बाळगावा असे आवाहन परभणीचे पोलिस अधिक्षक कृष्णकांत उपाध्याय यांनी केले आहे.

मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी गुरुवारी (नऊ) महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. या बंदच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कायदा व सुववस्था अबाधित ठेवण्यासाठी जिल्हा पोलिसांच्यावतीने सर्वत्र तगडा बंदोबस्त ठेवला आहे. 

मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आंदोलक व पोलिस यंत्रना यांच्यात समन्वयाचे दृष्टीने जिल्हा पोलिस दलाने पूर्व तयारी म्हणून पोलिस ठाणे, बीट, उपविभाग व अधिक्षक कार्यालयस्तरावर सदर मागणी संबंधीत नागरीक, स्थानिक नेते, कार्यकर्ते, समर्थक यांच्या विविध स्तरावर बैठका घेण्यात आल्या. त्यात आंदोलनाची दिशा, पोलिसांचे सहकार्य व समन्वय तसेच आंदोलन विधायक रितीने करण्याबाबत चर्चा झाली. 

संवेदनशिल ठिकाणी विशेष बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. सोशल मिडियाच्या माध्यमातून अफवा पसरविणे हा कायद्याने गुन्हा आहे. यावर सायबर पोलिसांची करडी नजर आहे. सर्व नागरीकांनी व आंदोलनकर्त्यांनी जिल्हा पोलिस दलास सहकार्य करावे. कोणही कायदा हातात घेऊ नये असे आवाहन पोलिस अधिक्षक कृष्णकांत उपाध्याय यांनी केले आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख