सकल मराठा समाजाचा राष्ट्रवादीला पाठिंबा

मराठा क्रांती मोर्चाने राज्यभरात भाजप सरकार विरोधात रान उठवले होते.
सकल मराठा समाजाचा राष्ट्रवादीला पाठिंबा

पंढरपूर : सकल मराठा समाज आणि मराठा क्रांती मोर्चाने विधानसभा निवडणुकीसाठी आज राष्ट्रवादी काँग्रेसला पाठींबा जाहीर केला. सकल मराठा समाजाचे राज्य समन्वयक रामभाऊ गायकवाड यांनी आज पंढरपुरात ही घोषणा केली.

मराठा आरक्षण प्रश्नावर सकल मराठा समाज आणि मराठा क्रांती मोर्चाने राज्यभरात भाजप सरकार विरोधात रान उठवले होते. लोकसभा निवडणुकीत सकल मराठा समाजाने भाजप शिवसेनेला विरोध केला होता. त्यानंतर आता विधानसभा निवडणुकीतही सकल मराठा समाजाने राष्ट्रवादी काँग्रेसला पाठींबा जाहीर केला आहे.

यावेळी औरंगाबादचे राज्य समन्वयक संजय सावंत, बापूसाहेब शिरसट, रूपालीताई पाटील, हणमंत पोपळे, किरण घाडगे, गणेश गोडसे, समाधान सुरवसे आदी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com