maratha andolan at girish bapat residence | Sarkarnama

मराठा आंदोलक उद्या पालकमंत्री गिरीश बापटांना घेरणार 

उमेश घोंगडे
बुधवार, 1 ऑगस्ट 2018

पुणे : मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनाचा भाग म्हणून पुण्यातील भारतीय जनता पार्टी व राष्ट्रवादी कॉंग्रेस नेत्यांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे.

उद्या (ता.2) सकाळी साडेआठ वाजता पालकमंत्री गिरीश बापट यांच्या कसब्यातील कार्यालयासमोर तर साडेदहा वाजता राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शहराध्यक्ष वंदना चव्हाण यांच्या लोकमान्यनगर येथील निवासस्थानासमोर हे आंदोलन करण्यात येणार आहे. सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांच्या निवास्थानासमारे दुपारी बारा वाजता ठिय्या आंदोलन होणार आहे. 

आंदोलनाचा विषय तापता ठेवण्याचा व या माध्यमातून राज्य सरकारवर दबाव कायम ठेवण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात येणार आहे. आरक्षण देण्याच्या दृष्टीने राज्य सरकारने ठोस पावले उचलल्याखेरीज आंदोलन थांबवायचे नाही, अशी आंदोलनकर्त्यांची भूमिका आहे. त्यामुळे वेगवेगळ्या माध्यमातून सातत्याने आंदोलने चालू राहणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

यापुढच्या काळातील आंदोलने शांततामय मार्गाने करण्यात येणार आहे. मात्र जनमताचा रेटा कायम ठेवण्यासाठी सर्व माध्यमांचा वापर करण्याची रणनिती वापरण्याचे कार्यकर्त्यांनी ठरविले आहे. चार दिवसांपूर्वी डेक्कन येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यापासून शिवाजीनगर येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत काढलेल्या मोर्चाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. या पार्श्‍वभूमीवर काढलेल्या या मोर्चानंतर लगेचच राजकीय नेत्यांच्या घरासमोर आंनोलनामुळे आंदोलनाचे वातावरण कायम ठेवण्यास मदत होणार असल्याचे या कार्यकर्त्यानी सांगितले. 
 
अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख