maratha agitation in phaltan | Sarkarnama

फडणवीसांना दुधासारखी पांढरी शुभ्र बुद्धी मिळो; फलटणला धोंडा पूजन! 

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 30 जुलै 2018

फलटण : येथील मराठा समाजाच्यावतीने अधिकार गृहासमोर बसलेल्या बेमुदत ठिय्या आंदोलनाच्या आज पाचव्या दिवशी शासनाची प्रतिमा म्हणून धोंड्यांचे पूजन करून दुग्धभिषेक केला. तसेच येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना गाजर वाटप करून अनोखे आंदोलन करण्यात आले. 

फडणवीस सरकारला दुधासारखी पांढरी शुभ्र बुद्धी द्यावी आणि मराठा समाजाला लवकरात लवकर आरक्षण देण्याची मागणी करण्यात आली. राज्य सरकारला अल्टीमेटम देण्यात आला की आमच्या भावनांचा उद्रेक होण्यापूर्वी निर्णय घ्यावा अन्यथा होणाऱ्या नुकसानीची पूर्ण जबाबदारी राज्य शासनाची राहील असेही सांगण्यात आले आहे. फलटण येथील अधिकार गृहासमोर गेली पाच दिवस सुरू असलेल्या बेमुदत ठिय्या आंदोलनात सकल मराठा समाजाच्या वतीने वेगवेगळ्या प्रकारे आंदोलन सुरू आहे. सरकारने मागासवर्गीय आयोगाचा अहवाल नऊ ऑगस्टपर्यंत घेऊन त्याच दिवशी सर्व बाबींची पूर्तता करून मराठा समाजाला आरक्षण द्यावे. अन्यथा या पुढे हे सरकार उलथवून टाकण्याचे काम हा मराठा समाज करेल, असा इशारा देण्यात आला आहे. 

फलटण बार असोसिएशन मराठा समाजाच्या पाठीशी असून त्यांनी आंदोलन स्थळी येऊन पाठिंबा देत मराठा समाजातील ज्यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत. त्यांना न्यायालयात मदत करणार असल्याचे जाहीर केले. 
 
अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख