मराठा कार्यकर्ते घालणार शनिदेवाला अभिषेक 

केंद्रीय पातळीवरही आरक्षणासाठी आगामी काळात लढणार असल्याची प्रतिक्रिया मराठा मोर्चातील नेते, समाजातील कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या.
मराठा कार्यकर्ते घालणार शनिदेवाला अभिषेक 

नगर : मराठा समाजाला मिळालेल्या आरक्षणाचे आज जिल्हाभरातून उत्स्फुर्तपणे स्वागत करण्यात आले. या निकालाने समाजातील युवकांना न्याय मिळणार आहे. विविध संघटनांनी काढलेले मोर्चे, आंदोलनाचे हे यश असून, सध्या १३ टक्के मिळाले, आगामी काळात १६ टक्के आरक्षण मिळण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. तसेच केंद्रीय पातळीवरही आरक्षणासाठी आगामी काळात लढणार असल्याची प्रतिक्रिया मराठा मोर्चातील नेते, समाजातील कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने मराठा आरक्षणाबाबत सादर केलेला अहवाल योग्य होता. आम्ही सर्वच कार्यकर्ते गेल्या १५ ते २० वर्षांपासून एकत्र येत सुमारे ५७ मोर्चे काढले. आज त्याचे फलित समोर आले आहे. सध्या १३ टक्के आरक्षण मिळाले असले, तरी १६ टक्के मिळण्यासाठी आम्ही सुप्रिम कोर्टात याचिका दाखल करणार आहोत. आजच्या निकालाचे स्वागत आहे. त्यामुळे मराठा समाजातील गरीब, शेतकरी मुलांना न्याय मिळणार आहे. याबाबत उद्या (ता. २८) शनि शिंगणापूर येथे शनिदेवाला अभिषेक व मराठा समाजातील कार्यकर्त्यांची बैठक घेणार आहोत, अशी प्रतिक्रिया शेतकरी मराठा महासंघाचे राज्याचे अध्यक्ष संभाजी दहातोंडे यांनी दिली.
 
मराठा समाजाला मिळालेले आरक्षण हे सकारात्मक आहे. न्यायालयात महाराष्ट्र शासनाच्या वकिलांनी बाजू सक्षमपणे मांडली आहे. आरक्षणासाठी लढलेल्या संघटना, मराठा युवकांचे हे श्रेय आहे. शासनाने सुद्धा महत्त्वापूर्ण भूमिका बजावली. ही सुरुवात आहे. आगामी काळात १६ टक्के आरक्षण मिळण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. तसेच मराठा समाजातील युवकांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याबाबत आगामी काळात पाठपुरावा सुरूच ठेवणार आहोत, असे मत अखिल भारतीय मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र सावंत यांनी व्यक्त केले.  

मराठा समाजाने अनेक वर्षे संघटितपणे व एकमुखाने दिलेल्या लढ्याला अखेर यश आले आहे. हा निकाल संपूर्ण देशातील मराठा समकक्ष पटेल, जाट अशा समुहाला दिशा देणारा ठरेल. या लढ्यातील शहिदांना विनम्र अभिवादन करून सर्वांप्रती आदरभाव व्यक्त करीत या निकालाचे स्वागत करीत आहोत. आता मराठा समाजाला केंद्र सरकारच्या स्तरावर संस्था आणि सेवामध्ये आरक्षण मिळाले पाहिजे, यासाठी पाठपुरावा करू. प्रसंगी लढा देऊ. केंद्र पातळीवरही आरक्षण मिळाले पाहिजे, यासाठी आगामी काळात पाठपुरावा करू, असे मत शिवप्रहार संघटनेचे संस्थापक संजीव भोर यांनी व्यक्त केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com