लातूर जिल्ह्यात भाजपला खिंडार : रमेश कराड यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

लातूर ग्रामीण मधील भाजपचे वजनदार नेते, मुंडे परिवाराचे निकटवर्तीय रमेश कराड यांनी भाजपाला रामराम ठोकला असून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. पंधरा वर्षांनंतर ते स्वगृही परतले आहे. कराड यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेश हा भाजपच्या दृष्टीने मोठा धक्का आहे.कराड उस्मानाबाद, बीड, लातूर विधान परिषद मतदारसंघ निवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून अर्ज दाखल करणार आहेत.
लातूर जिल्ह्यात भाजपला खिंडार : रमेश कराड यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

लातूर : लातूर ग्रामीण मधील भाजपचे वजनदार नेते, मुंडे परिवाराचे निकटवर्तीय रमेश कराड यांनी भाजपाला रामराम ठोकला असून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. पंधरा वर्षांनंतर ते स्वगृही परतले आहे. कराड यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेश हा भाजपच्या दृष्टीने मोठा धक्का आहे. कराड उस्मानाबाद, बीड, लातूर विधान परिषद मतदारसंघ निवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून अर्ज दाखल करणार आहेत.

आज उस्मानाबाद मध्ये विधानपरिषदेतले विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत कराड यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. आमदार राणा पाटील, आमदार सतीश चव्हाण, आमदार अमरसिंह पंडित, बाबासाहेब पाटील, माजी आमदार पृथ्वीराज साठे, माजी आमदार जीवनराव गोरे, आमदार राहुल मोटे, बसवराज पाटील नागराळकर, अक्षय मुंदडा, बजरंग सोनवणे, संजय बनसोडे, डी. एन. शेळके आदी यावेळी उपस्थित होते. 

मी जुना राष्ट्रवादीचा आहे. संस्थापक आहे. ती वर्षे अध्यक्ष म्हणून काम केले होते. मी रस्ता चुकलो होतो भाजपात मी चवदा वर्ष वनवास भोगला. आता पंधराव्या वर्षी स्वगृही परत आलो, असे रमेश कराड यांनी पक्षप्रवेशाच्या वेळी सांगितले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com