Marartha kranti morcha : Extra bogie for railway | Sarkarnama

मराठा क्रांती मोर्चासाठी रेल्वेच्या प्रत्येक गाडीला ज्यादा डबे 

सरकारनामा ब्यूरो
शुक्रवार, 4 ऑगस्ट 2017

मुंबईत नऊ आॅगस्म रोजी होणाऱया मराठा क्रांती मोर्चासाठी विविध स्तरांवर जोरदार तयारी सुरू झाली आहे. खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी याबाबत रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांची भेट घेऊन जादा डब्यांची मागणी केली.

नवी दिल्ली : मुंबईत येत्या नऊ ऑगस्ट रोजी संपूर्ण महाराष्ट्रातून मराठा समाजाच्या मागण्यंसाठी मराठा क्रांती मोर्चा काढण्यात येत आहे. राज्यातून लाखो लोक मोर्चात येणार आहेत. त्यासाठी महाराष्ट्रासह इतर शेजारील राज्यातून मुंबईत पोहोचणाऱ्या रेल्वे गाडयांना ज्यादा डब्बे जोडण्याची खासदार संभाजीराजे छत्रपती यांची मागणी रेल्वेमंत्री सुरेश प्रभु यांनी तातडीने मंजूर केली. 

दिल्ली येथे रेल्वेमंत्री सुरेश प्रभु यांच्या कार्यालयात खासदार संभाजीराजे यांनी भेट घेतली. या प्रसंगी संभाजीराजे यांनी मराठा क्रांती मोर्चाची सर्व माहिती रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांना सांगितली तसेच महाराष्ट्रातून लाखो लोक मोर्चास येणार असल्याने वाहनांची सोय होणे अवघड असलेने रेल्वेला अतिरिक्त डब्याची सोय केली तर सर्व मराठा बांधव सुरक्षितपणे मोर्चास येऊ शकतील, असे समजावून सांगितले. 
तोंडावर आलेल्या या मोर्चाचे गांभीर्य लक्षात घेवून प्रभुनी ज्यादा डब्याची व्यवस्था करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. ही मागणी मान्य झाल्याने हजारो मराठा मोर्चेकऱ्यांना मुंबईत मोर्चासाठी येणे शक्य होणार असल्याचे संभाजीराजेंनी सांगितले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख