शिवसेनेत नाराजीचा स्फोट; तानाजी सावंत 'मातोश्री'कडे पुन्हा फिरकणार नाहीत

ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराला दोन दिवस उलटत नाहीत तोच शिवसेनेत नाराजी नाट्य सुरु झाले आहे. सर्व नाराज आमदार मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेणार असल्याचीही चर्चा आहे. मात्र या आमदारांनी अजून उद्धव ठाकरेंची अजून वेळ मागितलेलीनाही.
Many Shivsena Leader Including Tanaji Sawant Unhappy
Many Shivsena Leader Including Tanaji Sawant Unhappy

मुंबई : महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रीमंडळात स्थान मिळाले नसल्याने शिवसेनेत नाराजी पसरल्याच्या चर्चा आहेत. याच नाराजीचा पहिला स्फोट झाला असून माजी मंत्री तानाजी सावंत पुन्हा मातोश्रीकडे फिरकणार नसल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.

ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराला दोन दिवस उलटत नाहीत तोच शिवसेनेत नाराजी नाट्य सुरु झाले आहे. सर्व नाराज आमदार मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेणार असल्याचीही चर्चा आहे. मात्र या आमदारांनी अजून उद्धव ठाकरेंची अजून वेळ मागितलेली नाही. याशिवाय मंत्रिमंडळातील सर्व महत्त्वाची खाती राष्ट्रवादीला गेल्यानेही शिवसेना आमदारांमध्ये नाराजी असल्याची चर्चा आहे.

मंत्रिमंडळ विस्ताराच्या दिवशी आमदार सुनील राऊत यांना मंत्रिमंडळात जागा न मिळाल्याने ते आणि त्यांचे बंधू शिवसेना खासदार संजय राऊत नाराज असल्याची चर्चा होती. मात्र आपण नाराज नसल्याचे संजय राऊत आणि सुनील राऊत यांनी स्पष्ट केले. त्यानंतर रामदास कदम हे देखील आपल्या शिवसेना नेते पदाचा राजीनामा देणार असल्याची चर्च होती. रामदास कदम यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही. तसेच भास्कर जाधव, प्रताप सरनाईक आणि भावना गवळी यांनी तर उघड नाराजी व्यक्त केली आहे. 

मंत्रीपद न मिळाल्याने नाराज झालेल्या तानाजी सावंत यांनी आज मातोश्रीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी ठाकरे यांनी त्यांना समजावल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. परंतु, ठाकरे यांच्याकडूनही न्याय मिळाला नसल्याने सावंत पुन्हा मातोश्रीवर फिरकणार नसल्याचे सावंत यांच्या निकटवर्तीयांकडून सांगण्यात आले.

दरम्यान, महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्रीपद मिळले असे डझनभर आमदारांना वाटत होते. त्यात सुनिल प्रभू,रविंद्र वायकर,सुनिल राऊत,रामदास कदम,दिवाकर रावते,प्रताप सरनाईक,भास्कर जाधव,दिपक केसरकर,प्रकाश अबिटकर,अनिल बाबर,तानाजी सावंत,संजय शिरसाट,संजय रायमुलकर, आशिष जैस्वाल यांचा समावेश आहे. मात्र त्यांना संधी मिळाली नसल्याने ते नाराज झाल्याचा चर्चा आहे.

वाशीमच्या खासदार भावना गवळी यांनीही संजय राठोड यांच्या मंत्रिमंडळातील समावेशावरून आपली नाराजी व्यक्त केली. संजय राठोड यांनी लोकसभा निवडणुकीच्या वेळी भावना गवळींना उमेदवारी मिळू नये यासाठी खूप प्रयत्न केले अशी चर्चा आहे. मात्र, उमेदवारी मिळवून त्या विजयीही झाल्या. यावेळी गवळी यांनी बुलडाण्याचे संजय रायमूलकर आणि अकोल्याचे संदीप बाजोरीया यांना मंत्रिपद मिळण्यासाठी प्रयत्न केले होते. मात्र, उद्धव यांनी गवळी यांचे विरोधक असलेल्या संजय राठोड यांनाच कॅबिनेट मंत्री केले. त्यामुळे भावना गवळी नाराजी व्यक्त केली.

मंत्रीपदे कुणाला द्यायची याचा अधिकार उद्धव ठाकरे यांना आहे. पक्ष आणि सरकारच्या हिताचा निर्णय ते घेतात. त्यामुळे मंत्रीपद मिळाले नसल्यामुळे मी नाराज झालो असल्याच्या वृत्तात तथ्य नाही - दीपक केसरकर

मला मंत्रीपद देण्यात येईल, असे आश्‍वासन दिले होते. त्यामुळे कार्यकर्त्यानाही अपेक्षा होती. मात्र पक्षप्रमुखांनी घेतलेला निर्णय मला मान्य आहे. सत्तेमध्ये मी नाही पण, सत्ताधारी पक्षामध्ये मी आहे. मी उद्धव ठाकरेंना विचारणार आहे की मी कुठे कमी पडलो, माझी काय चूक आहे? आपल्या मनात माझ्याबद्दल राग आहे का? उद्धव ठाकरेंची वेळ मागितली आहे - भास्कर जाधव


कदाचित आपली निष्ठा कमी पडली असेल, तर आगामी काळात ती दाखवून देऊ - प्रताप सरनाईक

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com