Many Prominent Leaders will Decide About Party Change of Friday | Sarkarnama

साताऱ्यातील दिग्गजांच्या प्रवेशाचा शुक्रवारी मुहुर्त?

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 12 सप्टेंबर 2019

भारतीय जनता पक्षाने विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर जिल्ह्यात फोडाफोडीचे राजकारण सुरू केले आहे. यामध्ये मोठी दिग्गज नेते मंडळी त्यांच्या गळाला लागली आहेत. काहींनी प्रवेश केला आहे. पण काहीजण कार्यकर्त्यांचा कौल घेऊन निर्णय घेणार आहेत.

सातारा : जिल्ह्याच्या राजकारणात भाजप, शिवसेनेत प्रवेशाचे वारे वाहत असून दोन्ही कॉंग्रेसमधील दिग्गज मंडळी प्रवेशाच्या वाटेवर आहेत. ही मंडळी उद्या शुक्रवारी (ता. 13) आपल्या समर्थकांचा मेळावा घेऊन त्यांचा कौल आजमवणार आहेत. यामध्ये विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, आमदार आनंदराव पाटील, धैर्यशील कदम यांचा समावेश आहे. यासोबतच माणमधील सर्वपक्षीय आघाडीचा उमेदवार ही याच दिवशी ठरणार आहे.  येत्या दोन दिवसांत जिल्ह्यातील दिग्गज मंडळी भाजप किंवा शिवसेनेच्या गाडीत बसणार आहेत.

भारतीय जनता पक्षाने विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर जिल्ह्यात फोडाफोडीचे राजकारण सुरू केले आहे. यामध्ये मोठी दिग्गज नेते मंडळी त्यांच्या गळाला लागली आहेत. काहींनी प्रवेश केला आहे. पण काहीजण कार्यकर्त्यांचा कौल घेऊन निर्णय घेणार आहेत. यामध्ये विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी उद्या शुक्रवारी (ता. 13) कोळकी (ता. फलटण) येथील अनंत मंगल कार्यालयात आपल्या समर्थकांचा महामेळावा आयोजित केला आहे. 

या मेळाव्यात आपल्या कार्यकर्त्यांची मते जाणून घेऊन ते शिवसेना किंवा भाजपमध्ये जाण्याचा निर्णय जाहीर करणार आहेत. राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्यांत त्यांचा समावेश होत असल्याने त्यांच्या भुमिकेकडे सर्व जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

तर काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष आमदार आनंदराव पाटील हे कराडला मेळावा घेऊन त्यामध्ये भाजप प्रवेश्याचा निर्णय जाहीर करणार आहेत. तसेच कराड दक्षिणचे नेते धैर्यशील कदम हेही भाजप मध्ये की शिवसेनेत जायचे हे उंब्रज येथे मेळावा घेऊन भूमिका स्पष्ट करणार आहेत. शुक्रवार भाजप की शिवसेना प्रवेशाचा मुहूर्त वार ठरणार आहे.

हे देखिल वाचा - भाजपच्या आमदारांविरोधात शिवसेना खासदार बारणेंचे पुतणे इच्छुक

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store


संबंधित लेख