काॅंग्रेस व राष्ट्रवादी सोडून गेलेले अनेक नेते परतण्याच्या मार्गावर

सत्ता कोणाची स्थापन होणार, यावर गणित ठरणार!
काॅंग्रेस व राष्ट्रवादी सोडून गेलेले अनेक नेते परतण्याच्या मार्गावर

नागपूर : विधानसभा निवडणुकीपूर्वी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस या पक्षांतील जे उमेदवार पक्षांतर करून गेले होते. ते आज पक्षात परत येण्यासाठी आमच्यासोबत संपर्क साधत आहेत. ही संख्या मोठी असून त्यांच्या सोबतीला अपक्ष आमदारही असल्याचा दावा कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिकराव ठाकरे यांनी आज यवतमाळमध्ये केला.

आजही कॉंग्रेस ही वेट अँड वॉच भूमिकेत असल्याची दिसतेय. अगदी सावधपूर्ण पवित्रा कॉंग्रेसनी घेतल्याचे चित्र कॉंग्रेसचे जेष्ठ नेते माणिकराव ठाकरे यांच्या वक्तव्यावरून जाणवते. बीजेपी आणि शिवसेनेत वितुष्ठ आल्याने त्यांचे सरकार स्थापन होऊ शकले नाही. त्यामुळे आम्ही तिन्ही पक्ष एकत्र आल्याशिवाय सत्ता स्थापन होऊ शकत नाही, असं चित्र निर्माण झालं आहे. पण वेगवेगळ्या विचारधारेचे पक्ष एकत्र येत असतील तर कॉमन मिनिमम प्रोग्राम याबद्दल स्पष्टता आल्यानंतरच हाय कमांड निर्णय घेतील असं सूचक वक्तव्य माणिकराव ठाकरे यांनी केले.

प्रत्येक पक्षाची विचारधारा वेगळी असून ती जोपासल्या जाईल, मात्र राज्यात जी परिस्थिती निर्माण झाली त्यावर उपाय म्हणून तिन्ही पक्ष एकत्र आल्याशिवाय सत्ता स्थापन होणार नाही हे देखील मात्र तितकेच स्पष्ट असल्याचेही त्यांनी सांगितले.

जयंत पाटील यांनी भाजपा आमदार राष्ट्रवादीच्या संपर्कांत असल्याने भीतीपोटी भाजपा सत्तास्थापनेचा दावा करीत असल्याचा आरोप ठाकरे यांनी केला. त्यांच्याकडे संख्याबळ असेल तर राज्यपालांकडे त्यांनी सत्तास्थापनेचा दावा करावा, असे आव्हान त्यांनी भाजपाला दिले. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे आपले आमदार फुटून कॉंग्रेस-राष्ट्रवादी सोबत जाऊ नयेत, म्हणून सत्ता बीजेपीची येणार असे भीतीपोटी व्यक्त करीत असल्याचाही त्यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com