`सध्या अनेक नेते टेन्शनमध्ये; फक्त पवार साहेबच बिनधास्त`

`राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष सर्वजण सोडून चालले असताना पवार साहेबांनी टेन्शनघेतले नाही`
`सध्या अनेक नेते टेन्शनमध्ये; फक्त पवार साहेबच बिनधास्त`

नारायणगाव : सरकार बनेल?कधी बनेल?काय बनेल?, हे हायकमांड ठरवतील. हायकमांड हे कधीच दिसत नसते. मात्र ते योग्य निर्णय घेतील. मंत्रिमंडळ साहेब(शरद पवार) ठरवतील. साहेब व माजी मुख्यमंत्री अजित पवार योग्य निर्णय घेतील. आपल्याला जे पात्र वठवायला सांगितले आहे. ते वठवयाचे आपला रोल संपला की विगेंत निघून जायचे. राजकारणात बऱ्याच गोष्टी घडत असतात ,रोज परिस्थिती बदलत असते. यामुळे अंतिम निर्णय होई पर्यंत मंत्रीमंडळा संदर्भात विनाकारण चर्चा करू नका, असा सल्ला विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी कार्यकर्त्यांना दिला.

खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या येथील जनसंपर्क कार्यालयाचे उद्‌घाटन खासदार डॉ.कोल्हे यांच्या मातोश्री रंजनाताई कोल्हे, वळसे पाटील यांच्या हस्ते झाले.

या वेळी आमदार अशोक पवार, अतुल बेनके, विघ्नहरचे अध्यक्ष सत्यशील शेरकर, तानाजी बेनके, गुलाबराव नेहरकर, सभापती देवदत्त निकम, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, रमेश भुजबळ, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुका अध्यक्ष पांडुरंग पवार, शरद लेंडे, अंकुश आमले, विजय कुऱ्हाडे, राजश्री बोरकर, भाऊ कुंभार, देवराम मुंढे, दादाभाऊ बगाड, सुजित खैरे, सूरज वाजगे आदी उपस्थित होते.

वळसे पाटील म्हणाले, ``सध्याच्या राजकीय घडामोडीमुळे राजकीय व्यक्ती टेंशनमध्ये आहेत. मात्र टेंशन न घेणारा एकचमाणूस म्हणजे पवार साहेब आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष सर्वजण सोडून चालले असताना पवार साहेबांनी टेन्शन घेतले नाही. राज्याचा झंझावाती दौरा करुन पवार साहेबांनी राजकीय परिस्थिती बदलून टाकली. अबालवृद्ध पवार साहेबांवर प्रेम करतातच. मात्र तरुणवर्ग सुद्धा पवार साहेबांकडे आकर्षित झाला असल्याचे चित्र या निवडणुकीत दिसून आले आहे. पुढील काळात तरुणांचे रोजगाराचे व शेतकऱ्यांचे प्रश्‍न प्राधान्याने सोडवायचे आहेत.``

डॉ. कोल्हे यांच्या माध्यमातून शिरूर लोकसभा मतदारसंघाला कर्तव्यदक्ष, कार्यक्षम, बुद्धिमान व प्रभावी वक्ता असलेला खासदार लाभला आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघातील पाच आमदार व खासदार डॉ. कोल्हे यांच्या माध्यमातून या भागातील प्रश्‍न मार्गी लागतील, असे वळसे पाटील यांनी सांगितले. 

खासदार डॉ. कोल्हे म्हणाले,``पवार साहेबांचे आशीर्वाद व वळसे पाटील यांचे मार्गदर्शन,जनतेचा आशीर्वाद यामुळे मी बावीस दिवसात खासदार झालो. निवडणुकीनंतर अधिवेशन,शिवस्वराज्य यात्रा,त्या नंतर विधानसभा निवडणुकीचा प्रचार दौरा या मुळे मतदारसंघासाठी वेळ देता आला नाही. मात्र जनतेने सांगितलेल्या कामात खंड पडू दिला नाही. हडपसर व नारायणगाव येथे हायटेक जनसंपर्क कार्यालय सुरू केले आहे.या कार्यालयाच्या माध्यमातून जनतेचे प्रश्‍न थेट खासदारापर्यंत पोचणार आहेत. सर्वसामान्यांचे प्रश्‍न सोडवण्यासाठी जनसंपर्क कार्यालय काम करेल.18 नोव्हेंबर ते 13 डिसेंबर 2019 दरम्यान अधिवेशन आहे. त्यानंतर दर गुरुवारी व शुक्रवारी मतदार संघाचे प्रश्‍न सोडवण्यासाठी उपलब्ध राहणार आहे.

कार्यक्रमाचे नियोजन आशिष हांडे,राजेंद्र कोल्हे,अरविंद लंबे,गणेश वाजगे,आशिष वाजगे यांनी केले.सूत्रसंचालन रामदास अभंग यांनी केले. आभार `विघ्नहर`चे अध्यक्ष शेरकर यांनी मानले.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com