कर्मचाऱ्यांनी घेतली मतमोजणीची धास्ती, अनेकांचा सुटीचा अर्ज

लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीच्या धास्तीने अनेक कर्मचाऱ्यांनी सुटीचे अर्ज टाकून या कामापासून सुटका मिळवली आहे. त्यामुळे मतमोजणीची प्रक्रिया सुरळीत पार पाडायची कशी, याचे 'टेन्शन' निवडणूक विभागाला आले आहे.
कर्मचाऱ्यांनी घेतली मतमोजणीची धास्ती, अनेकांचा सुटीचा अर्ज

नागपूर : लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीच्या धास्तीने अनेक कर्मचाऱ्यांनी सुटीचे अर्ज टाकून या कामापासून सुटका मिळवली आहे. त्यामुळे मतमोजणीची प्रक्रिया सुरळीत पार पाडायची कशी, याचे 'टेन्शन' निवडणूक विभागाला आले आहे.

नागपूर आणि रामटेक लोकसभा मतदारसंघासाठी ११ एप्रिलला मतदानाची प्रक्रिया पार पडली. खरी परीक्षा मतमोजणीच्या दिवशी होणार आहे. २३ मे रोजी सकाळी आठ वाजतापासून कळमना बाजारात मत मोजणीला सुरुवात होणार आहे. ईव्हीएममुळे मोजणीची प्रक्रिया सोपी आणि वेळ कमी झाला असला तरी बारीकसारीक गोष्टीवर लक्ष ठेवावे लागते. यंदा प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील पाच केंद्रांवरील व्हीव्हीपॅटसुद्धा तपासावे लागणार आहे. निकाल जाहीर व्हायला दुसरा दिवस उजाडणार. जिल्हाधिकारी यांनीच तसे स्पष्ट केले आहे. त्यामुळे २२ ते २४ असे तीन दिवस मतमोजणीच्या कामात असणाऱ्या कर्मचाऱ्यांना मोठे टेन्शन राहणार आहे.

मतमोजणीसाठी ८८८ कर्मचाऱ्यांची आवश्‍यक भासणार आहे. २८८ पर्यवेक्षक, ३१२ सूक्ष्म निरीक्षक आणि २८८ मतमोजणी सहायकांचा त्यात समावेश आहे. नागपूरसाठी ४४४ तर रामटेककरिता ४४४ मनुष्यबळ लागणार आहे. निवडणूक विभागाकडून कर्मचाऱ्यांची नावेही निश्‍चित केली आहेत. निवडणूक प्रक्रिया आणि मतमोजणीचा अनुभव असलेल्या कर्मचाऱ्यांचीच निवड त्यात प्रामुख्याने करण्यात आली आहे. मात्र, काही कर्मचाऱ्यांना मोजणीस सोडण्यास काही विभागप्रमुखांनी नकार दिला आहे. काहींनी आधीच सुटीचा अर्ज टाकला आहे. आधीच अनुभवी दक्ष कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे. यातच अनेकांनी सुटीचा अर्ज टाकल्याने विभागावर चांगलाच ताण आला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com