Many Benefited by Medical Camps Organised By NCP Mla Rohit Pawar | Sarkarnama

रोहित पवारांमुळे रुग्णांचे वाचले दोन ते अडीच कोटी

संतोष आटोळे
बुधवार, 29 जानेवारी 2020

देशाचे माजी कृषीमंत्री शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार रोहित पवार यांच्या पुढाकारातुन आयोजित आरोग्य शिबिरांमध्ये 12 डिसेंबर पासुन आजपर्यंत 307 रुग्णांची मोफत अॅंजिओग्राफी, 29 बायपास सर्जरी व तब्बल 109 रुग्णांवर मोफत अॅंजिओप्लास्टी शस्त्रक्रिया यशस्वी झाल्या

शिर्सुफळ : देशाचे माजी कृषीमंत्री शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार रोहित पवार यांच्या पुढाकारातुन आयोजित आरोग्य शिबिरांमध्ये 12 डिसेंबर पासुन आजपर्यंत 307 रुग्णांची मोफत अॅंजिओग्राफी, 29 बायपास सर्जरी व तब्बल 109 रुग्णांवर मोफत अॅंजिओप्लास्टी शस्त्रक्रिया यशस्वी झाल्या. या शिबीरामुळे सामान्य रुग्णांचा सुमारे 2 ते 2.50 कोटींचा खर्च वाचला.याबाबत संबंधित रुग्णांमधुन समाधान व्यक्त होत आहे.

बारामती तालुक्यातील शिर्सुफळ - गुणवडी जिल्हा परिषद गटाचे सदस्य व सध्याचे कर्जत जामखेड विधानसभाचे आमदार रोहित पवार व बारामती हृदयरोगतज्ज्ञ डॉ. रमेश भोईटे यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या हृदयरोग शिबीरात 12 डिसेंबरपासून आजपर्यंत 307 रुग्णांची मोफत अॅंजिओग्राफी, 29 बायपास सर्जरी व तब्बल 109 रुग्णांवर मोफत अॅंजिओप्लास्टी शस्त्रक्रिया यशस्वी झाल्या.

रोहित पवार राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून अनंत आरोग्य अभियान राबवित आहेत. या अभियान व बारामतीतील कै. रा. तु. भोईटे प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमाने बारामतीत ते अॅंजिओप्लास्टी व हृदय शस्त्रक्रियेचे शिबीर भरवत आहेत. आतापर्यंत 4 वर्षात या शिबीरातून 1161 एवढ्या अॅंजिओग्राफी व 498 अॅंजिओप्लास्टी व 52 बायपास सर्जरी झाल्या.या शिबीरात राज्यभरातील रुग्ण सहभागी होत आहेत.

रोहित पवार यांनी जिल्हा परीषदेचे सदस्य झाल्यानंतर ही हृदयरोग शिबीराची संकल्पना मांडली, त्यास प्रतिसाद देत डॉ.भोईटे यांनी या शस्त्रक्रिया विविध योजनांचे साह्य घेऊन व लाभार्थ्यांचीही आर्थिक स्थिती लक्षात घेऊन मोफत करण्याची तयारी दाखविली. यामध्ये अॅंजिओग्राफीसाठी येणारा खर्चही भरण्यासाठी रुग्णांची ऐपत नसल्याने शासकीय योजनांचाही लाभ घेणे अनेकदा मुश्कील होते हे लक्षात आल्याने पवार यांनी त्यासाठीचा खर्च उचलण्याची तयारी दाखवली. त्यातून सन 2016 पासून ही शिबीरे आयोजित केली जात आहेत.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख