विधानसभा २०१९ : नाशिक पश्चिममध्ये इच्छुकांची भाऊगर्दी

बहुभाषिक, कामगार, कारखानदारांची संख्या अधिक असलेला शहरातील नाशिक पश्‍चिम विधानसभा मतदारसंघ पूर्वीपासून भाजप व शिवसेनेला साथ देणारा आहे. त्यामुळे या दोन्ही पक्षांमध्ये उमेदवारीसाठी चुरस आहे. या भागात शिवसेना व भाजपची समसमान ताकद आहे. सिडको प्रभाग समितीवर शिवसेनेचे वर्चस्व आहे.
Dinkar Patil  - Seema Hire Aspirants in Nashik West For Assembly Elections
Dinkar Patil - Seema Hire Aspirants in Nashik West For Assembly Elections

नाशिक पश्‍चिम विधानसभा मतदारसंघ यंदा तिसऱ्या निवडणुकीला सामोरे जाणार आहे. सन 2009 मध्ये नव्याने तयार झालेल्या या मतदारसंघात येथील मतदार मनसेच्या लाटेवर स्वार झाले होते. मनसेचे नितीन भोसले निवडून आले होते. त्यानंतर भाजपच्या सीमा हिरे यांना निवडून देत भाजपच्या  लाटेवर मतदार स्वार झाले होते. सध्या येथे इच्छुकाची संख्या मोठी आहे. भारतीय जनता पक्ष व शिवसेनेची युती वा कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसची आघाडी होवो अगर न होवो, अनेकांनी निवडणूक लढविण्याची तयारी सुरु केली आहे. 

बहुभाषिक, कामगार, कारखानदारांची संख्या अधिक असलेला शहरातील नाशिक पश्‍चिम विधानसभा मतदारसंघ पूर्वीपासून भाजप व शिवसेनेला साथ देणारा आहे. त्यामुळे या दोन्ही पक्षांमध्ये उमेदवारीसाठी चुरस आहे. या भागात शिवसेना व भाजपची समसमान ताकद आहे. सिडको प्रभाग समितीवर शिवसेनेचे वर्चस्व आहे.

      सुधाकर बडगुजर

माजी विरोधी पक्षनेते सुधाकर बडगुजर, शिवसेनेचे महापालिकेचे गटनेते विलास शिंदे, माजी सभागृहनेते दिलीप दातीर शिवसेनेकडून इच्छुक आहेत. 

भाजपकडून विद्यमान आमदार सीमा हिरे पुन्हा रिंगणात उतरणार आहेत. आमदार हिरे यांच्यासमोर माजी सभागृह नेते दिनकर पाटील यांचेच मोठे आव्हान आहे. महापालिका निवडणुकीपासून हिरे व पाटलांमधील वाद एकमेकांना स्पर्धक निर्माण होऊ नये यातूनच झाले आहेत.

    डाॅ. प्रशांत पाटील

विधान परिषदेत भाजपकडून नशीब अजमावणारे डॉ. प्रशांत पाटील हे सुद्धा इच्छुक आहेत.  'निमा'च्या अध्यक्षपदाचा कार्यभार हाती घेणारे शशिकांत जाधव यांची देखील निवडणुक लढविण्याची इच्छा आहे. महापालिकेचे सभागृहनेते सतीश सोनवणे, भाजपच्या उद्योग आघाडीचे प्रदीप पेशकार यांनी निवडणुक लढविण्याची तयारी केली आहे. 

         अपूर्व हिरे

लोकसभा निवडणुकीपूर्वीच राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणारे डॉ. अपूर्व हिरे यांनी दोन वर्षांपासून निवडणुकीची तयारी केली आहे. पहिल्याच निवडणुकीत मनसेचे नितीन भोसले निवडून आले होते. दुसया टर्म मध्ये पराभव झाला यंदा पुन्हा मनसेकडून ते तयारी करतं आहे. त्याव्यतिरिक्त मनसेचे शहराध्यक्ष अनिल मटाले किंवा स्थायी समितीचे माजी सभापती सलीम शेख मनसेचे उमेदवार होऊ शकतात. डॉ. डी. एल. कराड किंवा माजी नगरसेवक अॅड. तानाजी जायभावे माकपचे उमेदवार होवू शकतात.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com