एसटी कर्मचाऱ्यांचे जुलै महिन्याचे वेतन होणार : सरकारकडून 500 कोटींचा निधी

पैसे नसल्याने एसटी कर्मचाऱ्यांची स्थिती हलाखीची झाली आहे..
एसटी कर्मचाऱ्यांचे जुलै महिन्याचे वेतन होणार : सरकारकडून 500 कोटींचा निधी
Ajit Pawar

मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांनी (ST) वेतन मिळत नसल्याने आत्महत्येचा इशारा दिल्यानंतर आणि काहींनी आत्महत्या केल्यानंतर राज्य सरकारला आता जाग आली असून एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे वेतन व इतर आवश्यक बाबींसाठी 500 कोटी रुपयांचा निधी वितरीत करण्याचा आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिला.

हा निधी तातडीने वितरित करण्यात आला आहे. चालू आर्थिक वर्षासाठी 1450 कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पीय तरतूदीपैकी 838 कोटी रुपयांचा निधी एसटीला आधीच वितरित केला असून उर्वरीत 612 कोटींपैकी 500 कोटी रुपये तातडीने एसटी महामंडळाला देण्यात यावेत, असे निर्देश अजित पवार यांनी दिले.

कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाच्या उत्पन्नावर परिणाम होत असून महामंडळाची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली विशेष समिती काम करत आहे. समितीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत एसटी महामंडळाची आर्थिक स्थिती सुधारण्यासंदर्भातील उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली. त्यानुसार येणाऱ्या काळात कार्यवाही करण्यात येणार आहे.

कोरोना काळात आर्थिक उत्पन्नाचा फटका बसलेल्या एसटी महामंडळाला राज्य शासनाने गुरुवारी ५०० कोटी रूपयांची आर्थिक मदत दिली. राज्य शासनाच्या या निर्णयामुळे एसटीच्या ९३ हजार अधिकारी-कर्मचाऱ्यांचा जुलै २०२१ या महिन्याचा रखडलेल्या वेतनाचा प्रश्न सुटणार आहे, अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष . अनिल परब यांनी दिली. मागील सुमारे पावणे दोन वर्षांपासून कोरोनाच्या पार्श्वभूमिवर एसटी महामंडळाची स्थिती अधिकच खालावली आहे. पूर्वी असलेला संचित तोटा या काळात दुपटीने वाढला आहे. त्यामुळे एसटीची एकूणच आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची उपसमिती गठीत केली होती.  

कोरोना महामारीमुळे राज्यात लागू करण्यात आलेल्या निर्बंधामुळे एसटीची वाहतूक मंदावली होती. त्याचा विपरीत परिणाम एसटीच्या तिकीट महसूलावर झाला आहे. प्रवासी संख्या रोडावल्याने अपेक्षित उत्पन्न मिळेनासे झाले होते. आता पुर्ण क्षमतेने एसटीची वाहतूक सुरु असली तरी प्रवाशांचा फारसा प्रतिसाद मिळत नाही आहे. त्यातच इंधनाचे वाढते दर, टायर व वाहनांच्या सुट्या भागांच्या वाढलेल्या किंमती याचा विपरित परिणाम महामंडळाच्या आर्थिक स्थितीवर होत आहे. त्यामुळे दैनंदिन खर्च भागवने देखील एसटीला शक्य होत नव्हते. मात्र हा निधी एसटी महामंडळाला मिळाल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. या मदतीबद्दल मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अनिल परब यांनी आभार मानले आहेत.   

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.