या कारणामुळे राज्यातील पोलिस भरती पुढे ढकलली?

केवळ २० ते २५ दिवसांसाठी त्यांचे आयुष्य उद्‌ध्वस्त होण्याचा धोका आहे
Police Recruitmen
Police RecruitmenSarkarnama

मुंबई : महाराष्ट्र सरकारने (Maharashtra Government) जाहीर केलेली पोलिस (Police) भरतीची प्रक्रिया प्रशासकीय कारणास्तव पुढे ढकलण्यात आली आहे. ही स्थगिती तात्पुरत्या स्वरूपात असून पुढच्या आठवड्याबाबत पोलिस भरतीबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. दरम्यान, पोलिस भरतीची प्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्याने भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांच्या उत्साहावर काहीसे विरजण पडले आहे. (Due to this reason police recruitment in the state was postponed)

दरम्यान, पोलिस भरती पुढे ढकलण्यात यावी, अशी मागणी होमगार्ड संघटनेने केली. काही होमगार्डंना संघटनेकडून करण्यात आली होती. सुमारे अडीच हजार होमगार्डंना पोलिस भरतीत पाच टक्के आरक्षण मिळण्यासाठी केवळ २० ते २५ दिवसांचा कालावधी कमी पडत आहे, त्यामुळे ही भरतीप्रक्रिया पुढे ढकलण्याची मागणी संघटनेकडून करण्यात आली होती. प्रशासकीय कारणास्तव ही भरतीप्रक्रिया पुढे ढकलण्याबाबत सांगण्यात आले आहे. मात्र, होमगार्ड संघटनेच्या मागणी त्यामागे असावी, अशी चर्चा रंगली आहे.

Police Recruitmen
पिकाच्या पंचनाम्यावरून माजी सरपंचाची विद्यमान सरपंचांना मारहाण

राज्याच्या गृह विभागाने नुकतीच राज्यात तब्बल १४ हजार ९५६ जागांची भरती प्रक्रिया जाहीर केली हेाती. मात्र, त्याच्या दुसऱ्याच दिवशी ही भरती प्रक्रिया रद्द केल्याचे पत्रक गृहविभागाने जाहीर केले आहे. पोलिस शिपाईभरतीबरोबरच एसआरपीएफ दलातील पोलिस भरतीही पुढे ढकलण्यात आली आहे.

Police Recruitmen
कोल्हापुरात ऊसदर आंदोलन चिघळले : शिरोळ बंद पुकारणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नाशिक पूर्वचे आमदार राहुल उत्तराम ढिकले यांनी पत्र पाठवून पोलिस भरती पुढे ढकलण्याची मागणी केली होती. पोलिस भरतीत होमगार्डंना ५ टक्के आरक्षण मिळण्यासाठी ही भरती प्रक्रिया ३० दिवस पुढे ढकलावी, अशी मागणी ढिकले यांनी केली आहे.

फडणवीसांना पाठविलेल्या पत्रात होमगार्ड संघटनेच्या वतीने ढिकले यांनी म्हटले आहे की, २०१९ मधील भरतीचे २५०० होमगार्ड ३० नोव्हेंबर रोजी कार्यकाल पूर्ण करीत आहेत. हे अडीच हजार होमगार्ड पोलिस भरतीतील पाच टक्के आरक्षणाला केवळ २० ते २५ दिवसांमुळे मुकणार आहेत. बऱ्याच जवानांची वयोमर्यादा संपत आल्याने ही पोलिस भरती त्यांची शेवटची असणार आहे. त्यांची ही संधी हुकल्यास त्यांच्यापुढे मोठ्या अडचणी येणार आहेत. केवळ २० ते २५ दिवसांसाठी त्यांचे आयुष्य उद्‌ध्वस्त होण्याचा धोका आहे, त्यामुळे पोलिस भरती प्रक्रिया ३० दिवस पुढे ढकलण्यात यावी, असे होमगार्ड संघटनेच्या वतीने आमदार ढिकले यांनी म्हटले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in