Police Recruitment : पोलिस भरतीसाठी अर्ज करण्यास १५ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

पोलिस भरतीसाठी आतापर्यंत सुमारे ११ लाख ८० हजार अर्ज प्राप्त झाले आहेत.
 police recruitment
police recruitment Sarkarnama

मुंबई : राज्यातील पोलिस (Police) भरतीसाठी अर्ज सादर करण्यास येत्या १५ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी जाहीर केले. (Big news : Application deadline for police recruitment extended till 15th December)

यासंदर्भात माहिती देताना उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, पोलिस भरतीसाठी आतापर्यंत सुमारे ११ लाख ८० हजार अर्ज प्राप्त झाले आहेत. अर्ज सादर करण्यातील अडचणी, विविध प्रमाणपत्र व भूकंपग्रस्त उमेदवारांना अर्ज करण्यासाठी वेळ मिळावा, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे, अशी घोषणाही उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी केली.

 police recruitment
Indapur Bjp : इंदापूर भाजपमध्ये इनकमिंग सुरू; हर्षवर्धन पाटलांचा राष्ट्रवादीच्या भरणेंना धक्का

दरम्यान, राज्यात सध्या पोलिस शिपाई, चालक अशा सुमारे १८ हजार जागांवर भरती प्रक्रिया सुरू आहे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची मुदत ही ३० नोव्हेंबर होती. अर्ज भरताना मात्र वेबसाइट सतत हँग होत होती तसेच, सर्व्हरही कायम डाउन होणे अशा अडचणींना उमेदवारांना तोंड द्यावे लागत होते. सर्व्हर डाऊन होण्याच्या त्रासामुळे उमेदवार वैतागले होते.

 police recruitment
Jat News : जतसंदर्भात पुढच्या कॅबिनेटमध्ये मोठा निर्णय होणार; आमदार सावंतांनी घेतली शिंदेंची भेट

पोलिस भरती अर्ज भरण्यासाठी १५ दिवसांची मुदतवाढ द्यावी, अशी मागणी आमदार धनंजय मुंडे यांच्यासह विविध नेत्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. त्यावर आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत सविस्तर चर्चा झाली. त्यात पोलिस भरतीसाठी अर्ज करण्यास आणखी पंधरा दिवस म्हणजे १५ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com