परमवीरसिंग यांच्यावर `लेटर बाॅम्ब` : हजारो कोटींची माया जमविल्याचा यादीसह आरोप

फडणवीस यांनीही मुख्यमंत्री झाल्यानंतर परमवीससिंग यांना क्रिम पोस्टिंग दिल्याची तक्रार
parambirsingh
parambirsingh

अकोला : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात लाचखोरी आणि खंडणीचे आरोप करत खळबळ उडवून देणारे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीरसिंग यांच्याच विरोधात आणखी एका पोलीस अधिकाऱ्याने भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप करत लेटर बॉम्ब टाकला. तब्बल 14 पानांची तक्रार लिहून परमवीरसिंग यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. या आधीच्या एका प्रकरणात राज्य सरकारने त्यांची चौकशी सुरू केली आहे. आता या तक्रारीचे काय होणार, याचे औत्सुक्य आहे.  

अकोल्यातील नियंत्रण कक्षात पोलीस निरीक्षक असलेल्या भीमराज उर्फ भीमराव घाडगे यांनी तब्बल 14 पानांचे तक्रारपत्रच परमवीरसिंग यांच्या विरोधात लिहले आहे. ही तक्रार राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, पोलीस महासंचालक आणि पोलीस महासंचालक लाचलुचपत विभागाला केली आहे.

या पत्रात सन २०१४ ते सन २०१९ मध्ये भाजपाचे सरकार सत्तेवर आले त्यावेळी तत्कालीन मुख्यमंंत्री देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व गृहमंत्री होते त्यांनी  सिंग यांच्यासाऱख्या वर्दीतील गुन्हेगारास शिक्षा करण्याऐवजी "ठाणे पोलीस आयुक्त" या पदी नेमणुक करून त्यांना ३ वर्ष, ३ महिने एकाच पदावर ठेवले. त्यावेळी त्यांच्यापेक्षा  ज्येठ अधिका-यांना डावलून ही नियुक्ती झाली. त्यामुळे इमानदार पोलिस अधिकारी के. एल. प्रसाद  यांनी राजीनामा दिला होता, असा आरोप या पत्रात घाडगे यांनी केला आहे. राज्यात गाजलेल्या बनावट मुद्रांक प्रकरणी गाजलेल्या तेलगी घोटाळ्यातही ते संशयित असल्याचे घाडगे यांनी म्हटले आहे.

हजारो कोटींचा भ्रष्टाचार?

परमबीर सिंग यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग करून विविध ठिकाणी हजारो कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप घाडगे यांनी आपल्या तक्रारीमधून केला आहे. ठाणे आयुक्तपदी असताना एकाच वेळी दोन सरकारी निवासस्थाने ते वापरत होते. मी याबाबत सरकारकडे तक्रार केल्यानंतर त्यांना 27 लाख रुपयांचा दंड झाल्याचे घाडगे यांनी म्हटले आहे. तसेच परमवीसरिंग यांनी कल्याण-डोंबिवलीतील पालिकेतील भ्रष्टाचाराच्या आरोपातील अधिकाऱ्यांना वाचविण्यासाठी माझ्यावर बेकायदेशीर दबाव टाकला. त्यामुळे प्रमुख आरोपींच्या विरोधात दोषारोपपत्र न्यायालयात गेलेच नसल्याचे घाडगे यांनी तक्रारीत नमूद केले आहे. घाडगे यांच्याकडे असलेल्या गुन्ह्यांमध्ये दोषारोपपत्र दाखल करताना परमवीरसिंग यांनी आयुक्त म्हणून कशी लुडबूड केली, याची उदाहरणे त्यांनी पत्रात दिली आहेत. तसेच परमवीसिंग यांच्या पत्नीची, त्यांच्या मुलीची कोठे-कोठे प्रचंड गुंतवणूक आहे, याचा आकडा त्यांना पत्रात दिला आहे. घाडगे यांच्या म्हणण्यानुसार त्यांच्या मुलाने सिंगापूर येथे एका कंपनीत दोन हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. त्यात त्याला गेल्या वर्षी 500 कोटी रुपयांचा तोटा झाल्याची गोपनीय माहिती मिळाल्याचा दावा त्यांनी केला आहे. इंडिया बूलमध्ये त्यांची 500 कोटी रुपयांची गुंतणवूक असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तेलगी याचा बनावट मुद्रांक बनविण्याचा कारखाना ठाणे पोलिसांच्या हद्दीत सापडला होता. तेव्हा परमवीरसिंग हे ठाण्याचे पोलिस अधीक्षक होते. मात्र त्याकडे त्यांनी तेव्हा दुर्लक्ष केल्याचे घाडगे यांनी म्हटले आहे. परमवीरसिंग यांच्या भ्रष्टाचाराबद्दल घाडगे यांनी या आधी चार पत्रे दिली होती. मात्र त्यावर कारवाई झालेली नाही, असेही त्यांनी या पत्रात म्हटले आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com