अशोक पवार, चेतन तुपे पुण्याच्या दोन आमदारांकडे दोन प्रमुख समित्यांची जबाबदारी - two mlas from Pune appointed as chairman of legislative committees | Politics Marathi News - Sarkarnama

अशोक पवार, चेतन तुपे पुण्याच्या दोन आमदारांकडे दोन प्रमुख समित्यांची जबाबदारी

सरकारनामा ब्यूरो
शुक्रवार, 6 नोव्हेंबर 2020

अनुसूचित जमाती कल्याण समितीच्या अध्यक्षपदी आमदार दौलत दरोडा यांची नियुक्ती झाली आहे.

पुणे : पुणे जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या दोन आमदारांना विधीमंडळाच्या दोन प्रमुख समित्यांच्या अध्यक्षपदी काम करण्याची संधी मिळाली आहे. शिरूर-हवेलीचे आमदार अशोक पवार यांची सार्वनिजक उपक्रम समितीच्या अध्यक्षपदी तर हडपसरचे आमदार चेतन तुपे यांची मराठी भाषा समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

राज्य सरकारतर्फे घेण्यात येणाऱ्या निर्णयांची अंमलबजावणी होते की नाही हे पाहणे, सरकारला याबाबत सूचना करण्याचे काम या समिती करत असतात. 

सार्वजनिक उपक्रम समितीत वैभव नाईक, रमेश कोरगावकर, योगेश कदम, रमेश बोरनारे, दिपक चहाण, अनिल पाटील, भारत भालके, पी.एन. पाटील, मोहनराव हंबर्डे, संजय जगताप, गणेश नाईक, मदन येरावार, सुरेश खाडे, प्रशांत ठाकूर, संजय केळकर, महेश लांडगे, माधुरी मिसाळ, महेश बालदी, देवेंद्र भुयार या आमदारांचा समावेश आहे.

मराठी भाषा समितीत अजय चौधरी, रमेश लटके, दिलीप मोहिते पाटील, श्रीमती सरोज अहिरे, कृणाल (बाबा) पाटील, धीरज देशमुख, सुभाष देशमुख, सुनील राणे, मुक्ता टिळक, अतुल भातखळकर यांचा समावेश आहे. 

अनुसूचित जमाती कल्याण समितीच्या अध्यक्षपदी आमदार दौलत दरोडा यांची नियुक्ती झाली आहे. या समितीत श्रीनिवास वनगा, महेंद्र दळवी, अनिल पाटील, शिरीष चौधरी, साहसराम कोरोदे, डॉ अशोक उईके,  तुषार राठोड, राजेश पाडवी, भीमराव केराम, राजकुमार पटेल या आमदारांना स्थान मिळाले आहे. 

विमुक्त जाती व भटक्या जमाती कल्याण समितीचे अध्यक्ष शांताराम मोरे आहेत. नितिनकुमार देशमुख, इंद्रनील नाईक, रोहित पवार, बळवंत वानखेडे, राजू आवळे,  सुरेश भोळे, विनोद अग्रवाल, रत्नाकर गुट्टे, राजेंद्र राऊत आणि क्षितिज ठाकूर हे आमदार सदस्य आहेत.

महिला व बालकांचे हक्क आणि कल्याण समितीच्या श्रीमती सरोज अहिरे या अध्यक्षा असतील. इतर सदस्यांमध्ये यामिनी यशवंत जाधव, लता मंद्रकांत सोनवणे, सुमननाई आर.आर. पाटील, सुलभा खोडके, प्रतिभा पानोरकर, मंदा म्हात्रे, श्रीमती मोनिका राजळे, नमिता मुंदडा, गीत जैन, श्रीमती मंजुळा गावीत या महिला आमदार आहेत. 

इतर मागासवर्ग कल्याण समिती प्रमुखपदी मंगेश कुडाळकर यांची नियुक्ती झाली आहे. दीपक केसरकर,  राजू कारेमोरे, राजेश नरसिंग पाटील, विकास ठाकरे, राजेश एकडे, गणपत गायकवाड, पंकज भोयर, सीमा हिरे, तानाजी मुटकुळे आणिमंजुळा गावीत अशी इतर सदस्यांची नावे आहेत. 

अल्पसंख्यांक कल्याण समितीचे अमिन पटेल हे प्रमुख असतील. रवींद्र वायकर, मकरंद जाधव पाटील, संदीप क्षीरसागर, झिशान सिद्दीकी, काशिराम पावरा, क्ॅप्टन तमिळ सेल्वन, नरेंद्र भोंडेकर, कुमार आयलानी आणि गीता जैन अशी इतर नावे आहेत.

अनुसूचित जाती कल्याण समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी प्रणिती शिंदे यांच्याकडे देण्यात आली आहे. इतर सदस्यांमध्ये बालाजी किणीकर, संतोष बांगर, यशवंत माने, किरण लहामटे, लहू कानडे, लखन मलिक, सुनील कांबळे, नामदेव ससाणे, टेकचंद सावरकर आणि नरेंद्र भोंडेकर

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख