प्रत्येक पोलिस शिपाई हा फौजदार म्हणून निवृत्त होणार : वळसे पाटलांची घोषणा

पोलिस शिपायांसाठी मोठी घोषणा..
dilip walse patil
dilip walse patil

पुणे : पुणे जिल्हा ग्रामीण पोलिस दलाने उभारलेल्या पेट्रोल पंपाचे उदघाटन करताना गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पोलिस कर्मचाऱ्यांना खूष करणारी घोषणा दोन जुलै रोजी केली होती. आता जाहीर कार्यक्रमातच बोलले असल्याने ती घोषणा मनावर कोणी फारशी मनावर घेतली नाही. कारण कार्यक्रमात असे बोलायचेच असते. मात्र त्यानंतर त्यांनी आज या कार्यक्रमाचे ट्विटपण केले आणि पोलिसांनाहीसुखद धक्का बसला. (Home Minister Dilip Walse Patil announces new promotion proposal for Police Department)

यानुसार प्रत्येक  पोलीस शिपाईसुद्धा पीएसआय (फौजदार) होऊ शकणार आहे. या दृष्टीने काम सुरू असल्याची माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली आहे. या प्रस्तावानुसार पोलीस दलात शिपाई पदावर कार्यरत असणाऱ्यांना निवृत्त होताना थेट पोलिस उपनिरीक्षक पदापर्यंत पोहोचता येणार आहे. आतापर्यंत खुल्या गटातील शिपाई हे हवालदारापर्यंत पोहोचत होते. राखीव कोट्यातील काहींना पीएसआय व्हायची संधी मिळते. पण त्यांचे प्रमाणही फारच कमी आहे. 

गृह विभागात या  प्रस्तावावर काम सुरू आहे. गृहमंत्र्यांनी केलेल्या ट्विटनुसार पोलीस दलात शिपाई पदावर कार्यरत असणाऱ्यांना निवृत्त होताना पोलीस उपनिरीक्षक पदापर्यंत पोहोचता यावे, यासाठी गृहविभागातर्फे प्रस्ताव तयार करण्यात येत आहे. पावसाळी अधिवेशनानंतर याबाबत मंत्रालयात बैठक घेऊन निर्णय घेणार असल्याची माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली आहे.

महाराष्ट्रात सुमारे दोन लाख पोलिस कार्यरत आहेत. यातील दहा टक्के अधिकारी सोडले तरी एक लाख 80 हजार शिपाई आहेत. काॅन्स्टेबल म्हणून भरती झालेले सिनिअर काॅन्स्टेबल, हेड काॅन्स्टेबल या पदापर्यंत पोहोचतात. काहीजण सहायक पोलिस उपनिरीक्षक (ASI) म्हणूनही निवृत्त होतात. हे ASI  खांद्यावरील फितीवर एक स्टार लावतात. PSI झालेले दोन स्टार लावतात. वळसे पाटील यांची घोषणा प्रत्यक्षात आली तरी प्रत्येक शिपाई हा दोन स्टार लावूनच निवृत्त होईल. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com