उर्जामंत्र्यांनी संचालक म्हणून निवडलेल्या संजय ताकसांडेंवर मनसेचा प्रहार!

मनसेचे संदिपदेशपांडे व संभूस यांनी मुबंईत पत्रकार परिषद घेऊन हे आरोप केले आहेत
Sandeep Deshpande-Nitin Raut
Sandeep Deshpande-Nitin Raut

पुणे : महावितरणच्या संचालक (संचालन) या पदावर असलेल्या संजय ताकसांडे (Sanjay Taksande) यांच्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मुंबईत महापालिकेतील गटनेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpandae) व पक्षाचे सरचिटणीस हेमंत संभूस (Hemant Sambhus) यांनी गंभीर आरोप केले असून ताकसांडे यांता तत्काळ निलंबित करण्याची मागणी केली आहे. (MNS strikes at Takasande chosen by Energy Minister) 

देशपांडे व संभूस यांनी मुबंईत पत्रकार परिषद घेऊन हे आरोप केले आहेत. ताकसांडे यांच्यावर पूर्वी निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. त्यांची ही पाश्‍र्वभूमी माहीत असूनही असा आधिकारी मुख्य पदावर कसा निवडण्यात आला असा प्रश्‍न देशपांडे यांनी विचारला असून उर्जामंत्री नितीन राऊत यांनी तातडीने ताकसांडे यांचे निलंबन करावे, अशी मागणी देशपांडे यांनी केली.

ताकसांडे यांच्याविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे लेखी तक्रार करण्यात आल्याचे संभूस यांनी सांगितले. ऊर्जा मंत्री राऊत यांनी कारवाई केली नाही तर मंत्र्यांच्या घरावर मोर्चा काढण्याचा इशारा संभूस यांनी दिला आहे. गृह खात्याप्रमाणे प्रत्येक विभागात एक `वाझे` नेमण्याची राज्य सरकारची भूमिका असल्याचे ताकसांडे यांच्या नेमणुकीवरू लक्षात येत असल्याचे देशपांडे यांनी सांगितले.    

ताकसांडे यांनी पुणे, वसई आदी ठिकाणी काम केले आहे. त्यांच्यावर विविध प्रकारचे आरोप झाले आहेत. त्यांचे निलंबन करण्यात आले. अशी सारी पार्श्वभूमी असलेल्या आधिकाऱ्याला राऊत यांनी नेमल्यामुळे राऊत आणि राज्य सरकारबद्दल लोकांच्या मनात शंकेला जागा निर्माण झाली आहे. गृह मंत्रालयात वाझे प्रकरण ताजे असताना अशा भ्रष्ट आधिकाऱ्याच्या नेमणुकांमुळे सामान्य माणसाच्या मनात राज्य सरकारबद्दल असलेली अविश्‍वासाची भावना अधिक घट्ट होत असल्याचे देशपांडे यांनी सांगितले. 

एकिकडे वीज बिलासाठी सामान्य माणसाला त्रास देण्याचे धोरण महावितरण राबवत असताना दुसरीकडे ताकसांडे यांच्यासारख्या आधिकाऱ्याला अत्यंत महत्वाचे पद कसे काय मिळते असा प्रश्‍न त्यांनी केला. या सर्व आरोपांबाबत ताकसांडे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता रात्री उशीरापर्यंत संपर्क होऊ शकला नाही. त्यांचे उत्तर आल्यानंतर या संदर्भात त्यांची बाजू दिली जाईल.  
Edited By : Umesh Ghongade


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com