कोरोना काळात न दिसल्याच्या कारणाने आमदाराला जिवंतपणी श्रद्धांजली : गुन्हा दाखल

विरोधकांचा हा डाव असल्याचे आमदाराचे म्हणणे
tekchand Savarkar
tekchand Savarkar

नागपूर : जिल्ह्यात करोनाचा उद्रेक सुरू असताना कामठीचे भाजपचे आमदार टेकचंद सावरकर कुठेच दिसत नव्हते. त्यामुळे ते हरवले असल्याच्या पोस्ट समाज माध्यमांवर फिरत होत्या. त्यातच एकाने त्यांना श्रद्धांजलीसुद्दा अर्पण केली. त्यामुळे चिडलेल्या आमदाराने थेट वाठोडा पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल केली.

ग्रामीण भागातही झपाट्‍याने करोनाचे संक्रमण वाढले आहे. मात्र लोकप्रतिनिधी दिसत नसल्याच्या तक्रारी आहे. बेड्‍स, ऑक्सिजन तसेच रेमडेसिव्हिर मिळत नसल्याने जनता हतबल झाली आहे. अशा परिस्थितीत कामठीचे आमदार काहीच मदत करीत नाही. ते दिसत नाहीत आणि तक्रारीची दखलही घेतल नसल्याबद्दल नाराजी आहे. त्यामुळे एका संतप्त नागरिकाने आमदार टेकचंद सावरकर हरवले असल्याची पोस्ट टाकली. त्यामुळे त्यांच्या विरोधकांना चांगलीच संधी मिळाली. ही पोस्ट संपूर्ण जिल्ह्यात व्हायरल झाल्याने चांगलाच चर्चेचा विषय झाला होता. यात एकाने व्हाट्‍ॲपवर चक्क आमदाराला श्रद्धांजली अर्पण केली. त्यामुळे आमदार चांगलेच संतापले. प्रीतम व त्याच्या दोन साथीदाराच्या विरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. याबाबत विचारणा केली असताना सावरकर यांनी पक्षाला बदनाम करण्यासाठी भाजप विरोधकांचा हा डाव असल्याचे सांगितले.

ही बातमी पण वाचा : नागपुरात आॅक्सिजनचे तीन टॅंकर पोहोचले....

महाराष्ट्रात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे औषधांसह ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे. राज्य सरकारकडून ऑक्सिजनच्या उपलब्धतेसाठी राज्य सरकारकडून युद्धपातळीवर सुरू असलेल्या प्रयत्नांना यश आले आहे. विशाखापटणम येथून प्राणवायू घेऊन निघालेली पहिली ऑक्सिजन एक्स्प्रेस शुक्रवारी रात्री ८.१५ वाजता नागपूर स्टेशनवर दाखल झाली. एकूण शंभर मेट्रिक टन लिक्विड ऑक्सिजन असलेले सात टँकर घेऊन पोहोचलेल्या या गाडीतून नागपुरात ३ टँकर उतरविल्यानंतर ही एक्स्प्रेस नाशिकच्या दिशेने रवाना झाली.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com