MPSC EXAM : आपल्या खात्याने काय निर्णय घेतला हे मंत्र्यालाच माहीत नव्हते.. - minister does not know what his dept take decision in Mahavikas Aghadi Govt | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

राजीव सातव यांच्या पार्थिवावर सोमवारी (ता. 17 मे) रोजी सकाळी दहा वाजता कळमनुरी (जि. हिंगोली) येथे अंत्यसंस्कार होणार.
राजीव सातव यांचे कोरोनाने निधन

MPSC EXAM : आपल्या खात्याने काय निर्णय घेतला हे मंत्र्यालाच माहीत नव्हते..

सरकारनामा ब्यूरो
गुरुवार, 11 मार्च 2021

वडेट्टीवार यांच्या खुलानाने अनेक प्रश्न 

मुंबई : महाविकास आघाडी सरकारमधील सावळा गोंधळ राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय झाल्यानंतर पुढे आला आहे. ज्या खात्याचा मंत्री त्याला न विचारताच आदेश काढल्याचे संबंधित मंत्री दावा करत आहेत.

कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वेगाने होऊ लागल्याने आपत्ती निवारण विभागाने परीक्षा पुढे ढकलाव्यात, असा राज्य लोकसेवा आयोगाला कळवले. त्यानंतर ही परीक्षा 14 मार्च रोजी होणारी परीक्षा रद्द केल्याचा आदेश आयोगाने 11 मार्च रोजी जाहीर केला. यावरून विद्यार्थ्यांनी प्रचंड असंतोष व्यक्त करत सरकारला धारेवर धरले. पुणे, मुंबई, औरंगाबाद, नांदेड, नाशिक येथे विद्यार्थ्यांनी स्वसंस्फूर्तीने रास्ता रोको केले. विद्यार्थ्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात होती. साहजिकच माध्यमांमध्ये तोच आज महत्वाचा विषय ठरला.

आपत्ती निवारण विभागाचे मंत्री विजय वडेट्टीवार हे आहेत. कोरोनाची लागण झाल्याने ते उपचार घेत आहेत. मात्र परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय त्यांना न विचारताच घेतल्याचे त्यांनी नंतर स्पष्ट केले.``माझ्या विभागाने मला न विचारता सचिव स्तरावरून परस्पर घेतलेला निर्णय आहे. मला याबाबत काही ही माहिती नाही. मला अंधारात ठेऊन घेतलेला निर्णय असल्याने याबाबत चौकशी करण्यात येईल, ``असे त्यांनी ट्विटरवरून जाहीर केले. 

``एक वेळ उपाशीपोटी राहून, घाम गाळून मुलांच्या शिक्षणाचा खर्च उचलणाऱ्या आई वडिलांचा विचार करून लवकर परीक्षा व्हावी ही सरकारची भूमिका आहे. विरोधी पक्षाने सामंजस्याची भूमिका घेऊन या संकटावर तोडगा काढण्यासाठी सरकारसोबत चर्चा करावी,आणि संकटात स्वतःचा फायदा संधी शोधणे थांबवावे,``असे आवाहन रुग्णालयातून वडेट्टीवार यांनी केले.

या निर्णयाचे समर्थन करण्याचा प्रयत्न सुरवातीला वडेट्टीवार यांनी केला. त्यासाठी व्हिडीओ  जारी केला.  ``राज्य सरकारने एमपीएससी परीक्षेबाबत आज घेतलेल्या निर्णयाला पुन्हा वेगाने वाढत असलेले कोरोना संकट कारणीभूत आहे. राज्यातील भाजप नेत्यांनी या संकटात तेल घालून विद्यार्थ्यांमध्ये गैरसमज पसरवू नये, अशी भूमिका त्यांनी मांडली.  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख