सोशल मीडियावर उद्धव ठाकरे, शरद पवारांची बदनामी; कऱ्हाडात दोघांवर गुन्हा - Defamation of CM on social media; Crime Registered in Karad Taluka Police Station | Politics Marathi News - Sarkarnama

सोशल मीडियावर उद्धव ठाकरे, शरद पवारांची बदनामी; कऱ्हाडात दोघांवर गुन्हा

सरकारनामा ब्यूरो
मंगळवार, 3 नोव्हेंबर 2020

सोशल माध्यमावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह महाविकास आघाडी सरकारची बदनामी होईल, अशा आशयाच्या पोस्ट व फोटो 12, 15, 16 आणि 19 ऑक्टोबर संबंधितांनी टाकले होते.

कऱ्हाड : सोशल मीडियावर महाविकास आघाडी सरकारसह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची बदनामी केल्याप्रकरणी कऱ्हाड तालुका पोलिस ठाण्यात दोघांवर सायंकाळी उशीरा गुन्हा दाखल झाला आहे. विद्यार्थी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा संघटक अक्षय शिंदे यांनी याबाबतची तक्रार दिली आहे. आकाश ठाकूर (रा. अमरावती) व रणजीतसिंग राणा अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. 

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, कऱ्हाड तालुक्यातील सुपने येथील अक्षय शिंदे राष्ट्रवादीच्या विद्यार्थी संघटनेचे जिल्हा संघटक आहेत. सचिन कुर्‍हाडे पक्षाच्या सोशल माध्यम सेलचे जिल्ह्याचे काम पाहतात. सोशल माध्यमावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह महाविकास आघाडी सरकारची बदनामी होईल, अशा आशयाच्या पोस्ट व फोटो 12, 15, 16 आणि 19 ऑक्टोबर संबंधितांनी टाकले होते.

अक्षय यांच्या ते निदर्शनास आले. त्यांनी राष्ट्रवादीच्या सोशल मिडीया सेलचे जिल्हाध्यक्ष सचिन कुर्‍हाडे यांच्या ही बाब निदर्शनास आणून दिली. त्यावेळी संबंधित सोशल मिडियावरील ग्रुप अमरावतीच्या आकाश ठाकूर (रा. अमरावती) यांनी केला आहे, असे स्पष्ट झाले. त्याबाबत अक्षय शिंदे यांनी आकाश ठाकूर व रणजीतसिंग राणा यांच्याविरोधात कऱ्हाड तालुका पोलिसात तक्रार दिली आहे. त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फौजदार गणेश कड तपास करीत आहेत.

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख