तीन पोलिस अधिकाऱ्यांना महासंचालकपदी बढती - state govt promotes three police officers as director general of police | Politics Marathi News - Sarkarnama

तीन पोलिस अधिकाऱ्यांना महासंचालकपदी बढती

सरकारनामा ब्यूरो
मंगळवार, 4 मे 2021

इतर अधिकाऱ्यांच्या बदलीचा मार्ग मोकळा...

पिंपरी : राज्य पोलिस दलातील तीन ज्येष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांना आज पदोन्नती मिळाली. त्यामुळे राज्याला तीन नवे पोलिस महासंचालक (डीजी) मिळाले. त्यासाठी तीन अपर पोलिस महासंचालकांना आज राज्य सरकारने पदोन्नती दिली. त्यात पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये पोलिस आयुक्त म्हणून काम केलेले अनुक्रमे डॉ. के.वेंकटेशम आणि संदीप बिष्णोई यांचा समावेश आहे. तर, तिसरे महासंचालक झालेले विवेक फणसळकर हे ठाण्याचे आयुक्त होते. (state govt promotes three police officers as director general of police )

Pimpri Chinchwad police commissioner Sandeep bishnoi may be transfer  because of increasing rate of crime in city | पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त  संदीप बिष्णोईंच्या बदलीची जोरदार चर्चा ! | Loksatta

राज्य पोलिस दलातील तीन महासंचालक दर्जाची पदे रिक्त होती. तेथे वरील तीन अधिकाऱ्यांच्या बढतीला गेल्या महिन्यात राज्य सरकारने हिरवा कंदिल दिला होता. त्यामुळे हा खांदेपालट या महिन्यात अपेक्षित होता. वेंकटेशम हे १९८८, तर बिष्णोई व फणसळकर हे १९८९ च्या आय़पीएस बॅचचे अधिकारी आहेत. त्यांच्या पदोन्नतीमुळे त्यांच्यानंतरच्या बॅचच्या बढतीचा मार्ग आता मोकळा झाला आहे. त्यामुळे आता आयपीएस पातळीवर आणखी काही बदल होणार आहेत. वेंकटेशम हे सध्या राज्याचे अतिरक्त तथा अपर पोलिस महासंचालक (विशेष कृती अभियान) होते. त्यांची नागरी संरक्षण विभागाच्या पोलिस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.तर, बिष्णोई हे अपर महासंचालक (लोहमार्ग) होते.त्यांना महासंचालक (न्यायिक व तांत्रिक विभाग) केले गेले आहे.तर, सध्या ठाण्याचे पोलिस आयुक्त असलेले फणसळकर यांना  पोलिस गृहनिर्माण व कल्याण महामंडळात नियुक्ती करण्यात आली आहे. ठाणे आयुक्तपदाचा अतिरिक्त कार्यभार ठाण्याचे सहआयुक्त सुरेशकुमार मेखला यांच्याकडे देण्यात आला आहे.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख