कोरोनाच्या आकडेवारीने चिंतेत असलेल्या सरकारसाठी GST चे संकलन दिलासा देणारे.....

जीएसटीचे संकलन दिलासा देणारे...
modi-sitaraman ff.jpg
modi-sitaraman ff.jpg

नवी दिल्ली : रोज नव्याने उच्चांक प्रस्थापित करणारी कोरोना रुग्णांची आकडेवारी ही मोदी सरकारची झोप उडवत असली तरी आज जाहीर झालेल्या एका आकडेवारीमुळे मोदी सरकारला हायसे वाटले आहे. ही आकडेवारी आहे वस्तू व सेवा कराच्या एकूण संकलनाची. देशात 2017 मध्ये जीएसटी लागू झाल्यानंतर पहिल्यांदाच इतके विक्रमी उत्पन्न मिळाले आहे. तब्बल 1 लाख 41 हजार 384 कोटी रुपये हे एप्रिल 2021 या महिन्यात  सरकारी तिजोरीत जमा झाले आहेत.

देशभर कोरोनामुळे विविध निर्बंध, लाॅकडाऊन सुरू असल्याने त्याचा फटका आर्थिक आघाडीवर बसेल, असा धोका व्यक्त होत होता. दुकाने, उद्योगधंदे, व्यवसाय हे बंद असल्याने कर कोण भरणार, अशी शंका उपस्थित होत होती. प्रत्यक्षात ती फोल ठरली आहे. त्यामुळे इतका विक्रमी कर सरकराला मिळाला आहे. अर्थ खात्याने ट्विटरवर ही माहिती दिली आहे. मागील सलग सात महिने एक लाख कोटींहून अधिक जीएसटी उत्पन्न मिळाल्याने केंद्र सरकारला मोठा आर्थिक दिलासा मिळाला आहे.

एप्रिल 2021 या महिन्यात एकूण 1 लाख 41 हजार 384 लाख कोटींपैकी केंद्राचा वाटा 27,837 कोटी रुपये तर राज्यांचा 35,,621 कोटी रूपये आहे. एकीकृत जीएसटी 68,481 कोटी आहे. त्यात उपकर 9445 कोटींचा आहे. मागच्या मार्च महिन्यात १ लाख २३ हजार ९०२ कोटींचा जीएसटी वसूल करण्यात आला होता.

ही कोरोनाची आकडेवारी 

देशातील कोरोनाचा प्रादुर्भाव आणखी वाढला आहे. देशात आज सकाळी 8 वाजेपर्यंत मागील 24 तासांत 4 लाख 1 हजार नवीन रुग्ण सापडले असून, 3 हजार 523 जणांचा मृत्यू झाला आहे. जगात एकाच सर्वाधिक कोरोन रुग्ण नोंदवण्याचा विक्रम भारताने नोंदवला आहे. देशात आता दरतासाला सुमारे 146 जणांचा तर महाराष्ट्रात दरतासाला 34 जणांचा  कोरोनामुळे बळी जात आहे. 

देशातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या आता 1 कोटी 91 लाख 64 हजार 969 झाली असून, कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या 2 लाख 11 हजार 853 झाली आहे. आज सकाळी 8 वाजेपर्यंत मागील 24 तासांत कोरोनाचे नवीन 4 लाख 1 हजार 993 रुग्ण सापडले असून, 3 हजार 523 जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे

देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 32 लाखांवर गेली आहे. सक्रिय रुग्णांची संख्या वाढल्याने देशातील आरोग्य व्यवस्थेवरील ताण प्रचंड वाढला आहे. यामुळे रुग्णांसाठी रुग्णालये अपुरी पडू लागल्याचे चित्र आहे. देशातील कोरोनाची रुग्णसंख्या दररोज वेगाने वाढत आहे. सक्रिय रुग्णांची संख्या 32 लाख 68 हजार 710 असून, एकूण बाधितांमध्ये याचे प्रमाण 17.06 टक्के आहे. देशात बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण कमी होऊन ते 81.84 टक्क्यांवर आले आहे. देशात बरे झालेल्या कोरोना रुग्णांची संख्या 1 कोटी 56 लाख 84 हजार 406 आहे. याचवेळी मृत्यूदर 1.11 टक्के आहे. 

मागील 24 तासांत देशात 3 हजार 523 मृत्यू झाले आहेत. यात सर्वाधिक मृत्यू महाराष्ट्रातील असून, 828 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यापाठोपाठ दिल्ली 375, उत्तर प्रदेश 332, छत्तीसगड 269, कर्नाटक 217, गुजरात 173, राजस्थान 155, उत्तराखंड 122, झारखंड 120, पंजाब 113 आणि तमिळनाडूतील 113 मृत्यूंचा समावेश आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com