45 हजार मागासवर्गीय राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या बढतीचा मार्ग मोकळा

गेली काही वर्षे हा प्रश्न प्रलंबित होता...
uddhav thackary-ajit pawar
uddhav thackary-ajit pawar

मुंबई : राज्य सरकारच्या सेवेतील सुमारे ४५ हजार मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना सेवा ज्येष्ठतेनुसार पदोन्नती देण्याचा मार्ग महाविकास आघाडी सरकारने मोकळा केला आहे. यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या उपसमितीने शिफारस केली असून मंत्रीमंडळाच्या बैठकीत त्यावर शिक्कामोर्तब होणार आहे. 

राष्ट्रवादी काॅंग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे यांनी या निर्णयाबद्दल मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे अभिनंदन केले आहे. तपासे म्हणाले की, "उपमुख्यमंत्री अजितदादांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उपसमितीच्या बैठकीत सदर निर्णय घेण्यात आला. लवकरच मंत्रिमंडळ बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात येईल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नेहमीच पुरोगामी धोरण अवलंबत मागासवर्गीय समाजाच्या हक्कांची पाठराखण केली आहे. आघाडी सरकारच्या काळात देखील पक्षातर्फे सामाजिक हक्क परिषद घेऊन तत्कालीन उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांनी मागासवर्गीय समाजासाठी असणाऱ्या महामंडळाचा निधी दुप्पट केला होता."

मागच्या सरकारने डिसेंबर २०१७ रोजी एक परिपत्रक काढून मागासवर्गीयांच्या पदोन्नतीत खोडा घातला होता, असा आरोपही तपासे यांनी केला. मागच्या सरकारची चूक आता महाविकास आघाडी सरकारने दुरुस्त केल्याचा दावा त्यांनी केला. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com