अकरा IAS अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा आदेश जारी : तुकाराम मुंढे अजून `वेटिंग`वर

नगरचे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनाही नवी नियुक्ती देण्यात आलेेली नाही.
tukaram-munde
tukaram-munde

पुणे : राज्यातील अकरा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या राज्य सरकारने केल्या. कोल्हापूर महापालिकेत अतिशय उत्तम काम करून तेथील जनतेच्या मनात आदराची भावना निर्माण केलेले मल्लिनाथ कलशेट्टी यांची पुण्यात भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेच्या संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. नगरच्या जिल्हाधिकारीपदी राजेंद्र भोसले यांना नेमण्यात आले आहे. तेथील जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या नवीन नियुक्तीचे ठिकाण देण्यात आलेले नाही.

नागपूरच्या पालिका आयुक्त पदावरून बदली झालेले तुकाराम मुंडे यांना मात्र सरकारने अद्याप वेटिंगवर ठेवले आहे. तेथील पालिका आयुक्तापदवारून त्यांची बदली महाराष्ट्र जीवन प्राधिकरणावर करण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र ते रुजू होण्याच्या आधीच तेथे दुसऱ्या अधिकाऱ्याला नेमण्यात आले. त्यामुळे मुंढे हे गेल्या महिनाभरापासून सध्या प्रतिक्षाधीन म्हणजे `वेटिंग`वर आहेत.

राज्य सरकारने आज केलेल्या बदल्या पुढीलप्रमाणे

1) श्री सी के डांगे, संचालक महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटी मुंबई रिक्त पदावर

2) श्री अभिमन्यू आर काळे यांची नियुक्ती आयुक्त अन्न व औषध प्रशासन मुंबई या पदावर

3) डॉक्टर मल्लिनाथ एस कळशेट्टी संचालक भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणा पुणे या पदावर

4) डॉक्टर अश्विनी जोशी यांची नियुक्ती व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र पेट्रोकेमिकल्स महामंडळ मर्यादित मुंबई या पदावर

5) श्री प्रवीण दराडे यांची नियुक्ती व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य लघुउद्योग विकास महामंडळ मुंबई या पदावर

6) श्रीमती पल्लवी दराडे यांची नियुक्ती सहसचिव गृह विभाग मंत्रालय मुंबई अपील व सुरक्षा या रिक्त पदावर 

7) श्रीमती जयश्री भोज यांची नियुक्ती व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मुंबई या पदावर 

8) श्री महेंद्रवार भुवन यांची नियुक्ती मुख्य कार्यकारी अधिकारी महात्मा फुले जन आरोग्य योजना मुंबई या पदावर

9) श्री एच पी तुम्मोड यांची नियुक्ती आयुक्त दुग्धविकास मुंबई या रिक्त पदावर 

10) श्री रवींद्रे बी भोसले यांची नियुक्ती जिल्हाधिकारी अहमदनगर या पदावर 

11) डॉ के एच कुलकर्णी, संचालक, नगर परिषद प्रशासन, मुंबई या पदावर

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com