"चोर ते चोर वर शिरजोर'  मंत्रालयात उपसचिवाचा प्रताप  - mantralaya | Politics Marathi News - Sarkarnama

"चोर ते चोर वर शिरजोर'  मंत्रालयात उपसचिवाचा प्रताप 

गोविंद तुपे ः सरकारनामा ब्युरो 
बुधवार, 17 मे 2017

मुंबई ः आपल्या चोऱ्या लपवून ठेवायच्या आणि दुसऱ्यांना मात्र कायद्याची भाषा शिकवायची आदर्श नमुना मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घालून दिला आहे. कामावर दररोज उशिरा उपस्थित राहिल्यामुळे उर्जा विभागातील उपसचिव वर्षा भरोसे यांच्यावर शासनाने जवळपास 4 लाख रूपयांची वसूली करण्याचे आदेश दिले आहेत. पण रोख शाखाच भरोसेंच्या ताब्यात असल्यामुळे स्वतःच्या वसुलीचे आदेश त्यांनी दाबून ठेवले आहेत. मात्र विभागातील इतर चतुर्थ श्रेणीतील कर्मचाऱ्यांची वसुली त्यांनी जोरात सुरू करीत कायद्याचा बडगा दाखवायला सुरूवात केली आहे. त्यामुळे चोर ते चोर आणि वरती शिरजोर अशी चर्चा उर्जा विभागात रंगली आहे. 

कृषी खात्यात अवर सचिव असताना भरोसे ऑगष्ट 2011 ते एप्रिल 2015 या कालावधीत कार्यालयात वारंवार उशिरा उपस्थित राहिल्याचे बायोमॅट्रिक मधून पुढे आले आहे. त्यामुळे त्यांनी सदरच्या कालावधीत घेतलेले वेतन त्यांच्याकडून वसूल करण्याचे आदेश 26 नोव्हेंबर 2016 रोजी देण्यात आले आहेत. मात्र या वसुली बाबत कुठल्याही स्वरूपाची कार्यवाही झालेली दिसत नाही. यामध्ये कळस म्हणजे वसुली संदर्भातील रोख शाखा भरोसेंच्या हातात असल्याने त्यांनी हे आदेश दाबून ठेवले आहेत. याउलट पदाचा दुरूपयोग करीत उर्जा विभागातील तीन चतुर्थ श्रेणीतील कर्मचाऱ्यांकडून वसूली सुरू केली आहे. मात्र आम्ही कार्यालयात सचिवांच्या आदेशामुळे उशिरा येऊन उशिरा जात असतो, त्यामुळे आमच्या पगारातून सुरू असलेली वसूली नियमबाह्य असल्याचे चतुर्थ श्रेणीतील कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. 

विशेष म्हणजे 3 दिवस उशिरा आल्यानंतर 1 रजा कापली जावी असा नियम आहे. मात्र चतुर्थ श्रेणीतील कामगार जेवढे दिवस उशिरा आले तेवढ्या दिवसांची रजा कापली आहे. त्यामुळे तीनास एक या नियमांचेही याठिकाणी उल्लंघन झाल्याचे कागदोपत्री आदेशावरून दिसते आहे. त्यामुळे उपसचिव दर्जाच्या अधिकाऱ्यांना नियमात झुकते माप आणि चतुर्थ श्रेणीतील कर्मचाऱ्यांवर अन्याय होत असल्याची तक्रार संबधिच सर्व सचिंवाकडे या कर्मचाऱ्यांनी केली आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख