मंत्रालयाला रॅंन्समवेअरपासून  धोका नाही : ब्रिजेशसिंग  - mantralay | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

उर्मिला मातोंडकर मातोश्रीवर दाखल

 मंत्रालयाला रॅंन्समवेअरपासून  धोका नाही : ब्रिजेशसिंग 

ब्रह्मा चट्टे : सरकारनामा ब्यूरो 
बुधवार, 17 मे 2017

मुंबई : रॅंन्समवेअर या वायरसने अवघ्या जगातील संगणकीय प्रणालीला लक्ष केले आहे. जगातील 100 पेक्षा अधिक देशातील संगणकीय व्यवस्थेला रॅंन्समवेअरपासून धोका निर्माण झाला आहे. महाराष्ट्राचा कारभार मंत्रालयातील संगणक प्रणालीला रॅंन्समवेअरपासून धोका नसून अद्याप अशी कोणतीही तक्रार आली नसल्यीची माहिती साबर गुन्हे विभागाचे पोलीस महासंचालक ब्रिजेश सिंग यांनी "सरकारनामा"शी बोलताना दिली. 

मंत्रालयामध्ये संपूर्ण कामकाज हे संगणकीय प्रणालीवर चालते. मंत्रिमंडळाच्या बैठका, शासन आदेश, परिपत्रके, विडीओ कॉंन्फरसींग, आपले सरकार पोर्टल याचबरोबर न्याय निवाडे आदी कार्यप्रणाली ही संपुर्णता संगणाद्वारे केली जाते. मंत्रालयाला आग लागलानंतर संपूर्ण अभिलेख हे डिजीटल स्वरूपात ठेवण्यात येत आहेत. त्यामुळे आता या नव्या वायरसमुळे पुन्हा लिखीत स्वरूपात नोंदी ठेवाव्या लागणार आहेत. मात्र, सध्या तरी योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. मंत्रालयाला रॅंन्सवेअरपासून कोणाताही धोका नसल्याचे समोर आले आहे. 

डिजीटल महाराष्ट्र ही संकल्पना घेवून राज्य सरकार युद्ध पातळीवर काम करत आहे. असे असतानाच या नव्या संकटाने डिजीटल महाराष्ट्राची पुनर्विचार करावा की काय अशीच परिस्थीती झाली आहे. सुमारे एक वर्षापूर्वा आलेल्या वायरसनंतर मंत्रालयात भीतीने जीमेल बंद केले होते. ती भीती मंत्रालयाच्या पथ्यावर पडली आहे. सध्या जीमेल वापर संपूर्णपणे बंद करण्यात आला आहे. कर्मचाऱ्यांना इंटरनेट वापराच्या योग्य त्या सुचनाही देण्यात आल्या आहेत. यामुळे जगभरात थैमान घालणाऱ्या रन्सवेअर वायरसपासून सध्या तरी मंत्रालय दुर असल्याची माहिती ब्रिजेश सिंग यांनी दिली आहे. 
 
अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख