मनोज लोहिया नांदेडचे नवे स्पेशल आयजी - Manoj Lohiya will be new special IGP of Nanded range | Politics Marathi News - Sarkarnama

मनोज लोहिया नांदेडचे नवे स्पेशल आयजी

उत्तम कुटे
शनिवार, 24 ऑगस्ट 2019

.

पिंपरीः पाच आयपीएस अधिकाऱ्यांच्या राज्य सरकारने बदल्या केल्या आहेत. त्यात नांदेड परिक्षेत्राचे (रेंज) विशेष पोलिस महानिरीक्षक(स्पेशल आयजी) प्रकाश मुत्याल आणि नांदेडचे एसपी (जिल्हा पोलिस अधीक्षक)संजय जाधव यांचा समावेश आहे.

मुत्याल यांची बदली झाली असली,तरी त्यांचे बदलीचे ठिकाण नंतर सांगणयात येणार आहे. तर, जाधव यांची बदली राज्य गुप्तवार्ता विभागात (एसआयडी) करण्यात आली आहे.

नांदेडचे स्पेशल आयजी म्हणून मनोज लोहिया (विशेष पोलिस महानिरीक्षक आणि मुख्य दक्षता अधिकारी,एसटी) यांची नियुक्ती झाली आहे.

उस्मानाबादचे एसपी राजा रामसामी यांचीही बदली एसआय़डीत पोलिस उपायुक्त (डीसीपी) म्हणून केली गेली आहे.

सोलापूरचे डीसीपी विजयकुमार मगर यांची नियुक्ती जाधव यांच्या जागी नांदेडचे एसपी म्हणून करण्यात आली आहे. तर,नागपूरचे डीसीपी राज तिलक रोशन हे आता उस्मानाबादचे एसपी असणार आहेत.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख