रामायण, महाभारत पुन्हा टिव्हीवर दाखवा, मग 'लॉकडाऊन' कसा होतो बघा!

या मालिकांसोबत पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, यशवंतराव चव्हाण, राजीव गांधी, अटलबिहारी वाजपेयी यांची भाषणे दाखवावीत
manohar shinde writes letter to prime minister and demands ramayan mahabhrat seriels on tv
manohar shinde writes letter to prime minister and demands ramayan mahabhrat seriels on tv

पुणे :"लॉकडाऊनच्या काळात रामायण, महाभारत या मालिका सुरू करा. असं केलं तर लोक घर सोडणार नाहीत," असे मत सातारा जिल्ह्यातील मलकापूरचे उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांनी व्यक्त केले आहे. या मागणीचे पत्र त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवलं आहे.

"लॉकडाऊनच्या काळात माझ्या लक्षात आलं आहे की, लोक घरात बसत नाहीत. घरात बसण्याचा लोकांना कंटाळा येतोय. त्यावर तोडगा म्हणून लोकांच्या आवडीचे विषय जर टीव्हीवर आले तर लोक घरात बसतील. काही वर्षांपूर्वी रामायण आणि महाभारत मालिका सुरू होत्या तेव्हा सगळे लोक टीव्हीसमोर बसायचे. रस्ता निर्मनुष्य असायचा. तेव्हा घरी बसा असं लोकांना सांगावं लागायचं नाही. मालिका बघण्यासाठी लोक घरी बसायचे. तोच उपाय केला तर लोक घरात थांबतील, असं वाटल्याने मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना इमेल पाठवला आहे,"असे शिंदे म्हणाले.

"टीव्हीवर रामायण महाभारत या मालिकांसोबत पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, यशवंतराव चव्हाण, राजीव गांधी, अटलबिहारी वाजपेयी यांची भाषणे दाखवावीत. जेणेकरून लोक घरी थांबतील. रस्त्यावर गर्दी करणार नाहीत.लॉक डाऊन यशस्वी होण्यासाठी हाच उपाय आहे,"असे शिंदे यांचे मत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com