manmohan singh birthday | Sarkarnama

आजचा वाढदिवस

वृत्तसंस्था
मंगळवार, 26 सप्टेंबर 2017

भारताचे माजी पंतप्रधान आणि कॉंग्रेसचे नेते डॉ. मनमोहनसिंग यांचा जन्म 26 सप्टेबर 1932 रोजी गाह (पंजाब, सध्या पाकिस्तानमध्ये) येथे झाला. बालपणी त्यांच्या आईवडिलांचे निधन झाले. त्यांचे संगोपन त्यांच्या आजीने केले होते. देशाच्या फाळणीनंतर त्यांचे कुटुंब अमृतसरला आले. चंडीगडमधील पंजाब विद्यापिठातून त्यांनी अर्थशास्त्र विषय घेऊन पदवी घेतली. पुढे केंब्रिज आणि ऑक्‍सफर्ड विद्यापिठात अर्थशास्त्राचा अभ्यास केला. एक अर्थतज्ज्ञ म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. 1971 मध्ये केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाचे आर्थिक सल्लागार होते. माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव यांनी डॉ.

भारताचे माजी पंतप्रधान आणि कॉंग्रेसचे नेते डॉ. मनमोहनसिंग यांचा जन्म 26 सप्टेबर 1932 रोजी गाह (पंजाब, सध्या पाकिस्तानमध्ये) येथे झाला. बालपणी त्यांच्या आईवडिलांचे निधन झाले. त्यांचे संगोपन त्यांच्या आजीने केले होते. देशाच्या फाळणीनंतर त्यांचे कुटुंब अमृतसरला आले. चंडीगडमधील पंजाब विद्यापिठातून त्यांनी अर्थशास्त्र विषय घेऊन पदवी घेतली. पुढे केंब्रिज आणि ऑक्‍सफर्ड विद्यापिठात अर्थशास्त्राचा अभ्यास केला. एक अर्थतज्ज्ञ म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. 1971 मध्ये केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाचे आर्थिक सल्लागार होते. माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव यांनी डॉ. सिंग यांना 1991 मध्ये केंद्रीय अर्थमंत्री म्हणून मंत्रिमंडळात घेतले. त्यावेळी भारतासमोर मोठे आर्थिक संकट होते. या संकटातून देशाला बाहेर काढण्यासाठी त्यांनी अनेक देशाचे दौरे केले. अर्थमंत्री होताच त्यांनी लायसन्स राज योजना बंद करून क्रांतीकारी निर्णय घेतला. देशाला आर्थिक महासत्ता बनविण्यासाठी ते नेहमीच प्रयत्नशिल राहिले. ते 1998 ते 2004 दरम्यान राज्यसभेत विरोधीपक्ष नेतेही होते. पुढे 22 मे2004 रोजी देशाचे पंतप्रधान बनले. सलग दहा वर्षे (2014 पर्यंत) ते या पदावर होते. एक संयमी नेतृत्त्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते.  
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख